पुण्यातील धक्कादायक प्रकार! बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेवर पेट्रोल ओतून पेटविण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 05:54 PM2023-01-20T17:54:31+5:302023-01-20T17:54:40+5:30

घटनेत महिला बचावली असून, पसार आराेपीचा शोध घेण्यात येत आहे

Shocking type in Pune To withdraw the complaint of rape an attempt was made to pour petrol on the woman and set her on fire | पुण्यातील धक्कादायक प्रकार! बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेवर पेट्रोल ओतून पेटविण्याचा प्रयत्न

पुण्यातील धक्कादायक प्रकार! बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेवर पेट्रोल ओतून पेटविण्याचा प्रयत्न

Next

पुणे : एका ६० वर्षाच्या ज्येष्ठाने महिलेला फिरायला जाऊ, असे सांगत बार्शीला नेत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिने केलेली बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी त्याने तिच्यावरच पेट्रोल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. ही घटना मुंढवा भागात घडली. या घटनेत महिला बचावली असून, पसार आराेपीचा शोध घेण्यात येत आहे.

याप्रकरणी रमजान खलील पटेल (वय ६०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३८ वर्षीय महिलेने मुंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. रमजान पटेल आणि महिलेचा परिचय आहे. त्याने सन २०१८ मध्ये पीडित महिलेला फिरायला जाऊ, असे सांगून बार्शी येथे नेले. त्यावेळी त्याने महिलेवर बलात्कार केला होता. याप्रकरणी महिलेने पटेलच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यातील पांगरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. बलात्काराचा खटला सोलापूर न्यायालयात दाखल असून सुनावणी सुरू आहे. रमजान काही दिवसांपूर्वी महिलेच्या घरी आला होता. त्याने महिलेला बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी धमकावले. महिला वास्तव्यास असलेल्या सोसायटीच्या आवारात तिला गाठले. गुन्हा मागे घेण्यासाठी धमकावून तिला शिवीगाळ केली. तिच्या अंगावर बाटलीतून आणलेले पेट्रोल ओतून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न रमजानने केला. सुदैवाने महिला बचावली. पसार झालेल्या रमजानचा शोध घेण्यात येत असून, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक काकडे तपास करत आहेत.

Web Title: Shocking type in Pune To withdraw the complaint of rape an attempt was made to pour petrol on the woman and set her on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.