धक्कादायक ! प्रसिद्ध अष्टविनायकांपैकी एक असलेल्या ओझरच्या विघ्नहर गणपती मंदिरात चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 12:06 PM2020-07-28T12:06:29+5:302020-07-28T13:23:25+5:30

दीड किलो चांदीची छत्री आणि रोख रक्कम पळवली.

ShockingTheft in Ojhar Vighnahar Ganapati temple, one of the famous Ashtavinayakas | धक्कादायक ! प्रसिद्ध अष्टविनायकांपैकी एक असलेल्या ओझरच्या विघ्नहर गणपती मंदिरात चोरी

धक्कादायक ! प्रसिद्ध अष्टविनायकांपैकी एक असलेल्या ओझरच्या विघ्नहर गणपती मंदिरात चोरी

googlenewsNext
ठळक मुद्देरोख रकमेसह एकूण ८० ते ९० हजारांचा ऐवज चोरीला

ओझर: अष्टविनायकांतील एक प्रमुख तीर्थ असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहर गणपती मंदिरात सोमवारी ( दि.२७)रात्री 2 वाजून 15 मिनिटाच्या दरम्यान चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत श्रींच्या मुकुटावरील अंदाजे एक ते दीड किलो चांदीचा मुलामा असलेली छत्री व तिजोरीतील एक हजार रुपये चोरीस गेले आहे.  

याबाबत अधिक माहिती देताना श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अद्यक्ष बी. व्ही. मांडे (अण्णा) यांनी सांगितले, लॉकडाऊन काळात मंदिर बंद राहणार असल्याने खबरदारी म्हणून लॉकडाऊन होण्यापूर्वी देवस्थानने अगोदरच श्रींचे सर्व सुवर्णालंकार बँक लॉकरमध्ये सुरक्षित ठेवले होते. तसेच लॉकडाऊनपूर्वी तिजोरी उघडून त्यामध्ये असणारी रक्कम बँक खात्यात वर्ग केल्यामुळे या घटनेत मोठा आर्थिक अनर्थ टळला आहे. मंदिरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये दोन धष्ट पुष्ट व्यक्तींनी मंदिरात  प्रवेश केल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या हातात हातात गलोरी व कटावणीसारखे लोखंडी हत्यारे दिसत आहे. १७ मार्चपासून मंदिर बंद असून या घटनेत सुमारे रोख रकमेसहित ८० ते ९० हजारांचा ऐवज चोरीला गेला असल्याचे अध्यक्ष मांडे यांनी सांगितले. 

श्रींच्या मंदिरात चोरीची माहिती मिळाल्यानंतर तातडीने घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना, पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी भेट दिली असून अधिक तपास ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या घटनेमुळे जुन्नर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Web Title: ShockingTheft in Ojhar Vighnahar Ganapati temple, one of the famous Ashtavinayakas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.