नगरपरिषदेच्या करवाढी विरोधात उंच टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन; पोलिसांनी उतरवले खाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 15:07 IST2025-04-01T15:07:11+5:302025-04-01T15:07:41+5:30
मंत्री शंभूराज देसाई यांनी आठ दिवसात हा विषय मार्गी लावला जाईल सबंधित विभागाने तत्काळ अहवाल द्यावा, असे सांगितले होते

नगरपरिषदेच्या करवाढी विरोधात उंच टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन; पोलिसांनी उतरवले खाली
राजगुरुनगर: राजगुरुनगर परिषेदेने करवाढ रद्द करावी याचा पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने प्रशासनच्या विरोधात ॲड दीपक थिगळे, स्वप्नील माटे यांनी दि.१ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता प्रांत कार्यालयाजवळ असलेल्या उंच टाकीवर चढून आंदोलन सुरू केले होते. आंदोलनकर्ते अॅड दीपक थिगळे आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांनी लेखी आश्वासन देण्याची अधिकाऱ्यांनी तयारी दर्शवली. मात्र थिगळे यांनी आंदोलन मागे घेतले नाही. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून थिगळे यांना टाकीवरून खाली उतरवले.
राजगुरुनगर परिषदेने केलेली करवाढ रद्द करावी या मागणीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सबंधित खात्याचे मंत्री, जिल्हाधिकारी, नगरविकास विभाग आदी सोबत करवाढ रद्द करावी यासाठी ॲड दीपक थिगळे यांनी निवेदने दिली होती. त्यावर कारवाई न झाल्याने खेड पंचायत समितीच्या पुढे मागील मार्च महिन्यात चार दिवसांचे उपोषण केले होते. यादरम्यान आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभा अधिवेशनात मुद्दा उचलून धरला होता. सबंधित खात्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी आठ दिवसात हा विषय मार्गी लावला जाईल सबंधित विभागाने तत्काळ अहवाल द्यावा. कारवाई करावी आहे उत्तर दिले होते. मात्र १५ दिवस उलटूनही त्यावर कार्यवाही झाली नसल्यामुळे अॅड थिगळे पाण्याच्या टाकीवर चढले अडीच तास ते टाकीवर बसून प्रशासनाविरोधात घोषणा देऊन धिक्कार करत होते. दरम्यान नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गरकळ, पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे, राजगुरूनगर शहरातील नागरिक त्यांना खाली येण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेर खेड पोलिसांनी थिगळे यांना टाकीवरून खाली उतरून ताब्यात घेतले.