बारामतीत ३८६ जणांची दुकानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:09 AM2021-06-24T04:09:17+5:302021-06-24T04:09:17+5:30

केवळ एकजण निघाला कोरोनाबाधित केवळ एक जण निघाला कोरोनाबाधित बारामती :बारामती शहरात ३८६ व्यापाऱ्यांच्या दुकानात जाऊन अँटिजन तपासणी करण्यात ...

In the shop of 386 people in Baramati | बारामतीत ३८६ जणांची दुकानात

बारामतीत ३८६ जणांची दुकानात

Next

केवळ एकजण निघाला कोरोनाबाधित

केवळ एक जण निघाला कोरोनाबाधित

बारामती :बारामती शहरात ३८६ व्यापाऱ्यांच्या दुकानात जाऊन अँटिजन तपासणी करण्यात आली. यामध्ये केवळ १ व्यापारी कोरोनाबाधित निघाल्याने बारामतीकरांना दिलासा मिळाला आहे.

उपविभागीय अधिकारी दादासो कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती नगर परिषद,पंचायत समिती आरोग्य विभाग व उपजिल्हा रुग्णालय यांच्या वतीने हा आरोग्य तपासणीचा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी आज शहरातील ३८६ दुकानदारांची अँटिजन तपासणी करण्यात आली यामध्ये केवळ १ व्यापारी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आला.

शहरातील भिगवण चौकातील उद्योग भवन, सिनेमा रोड, नेवसे रोड व सुभाष चौकापर्यंत १९४ लोकांची तसेच गुणवडी चौकातील राजर्षी शाहू महाराज कॉम्प्लेक्स, मासळी बाजार ,चिकन मार्केट,भाजीपाला दुकानदार, हातगाडीवर फ्रुट विकणाऱ्यांची तपासणी करण्यात आली.

मागील आठ दिवसांत ऐकून केलेल्या १३८६ तपासणी मध्ये २ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असल्याने बारामतीकरांसाठी ही दिलासा देणारी बाब आहे.तर बारामती नगर परिषदेच्या अतिक्रमण विभाग व सहकाऱ्यांच्या मदतीने ही मोहीम सुरू असल्याचे अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष तोडकर, समाज कल्याण अधिकारी सचिन खोरे व डॉ. हेमंत नाझीरकर यांनी सांगितले.

शासनाकडून सुपर स्प्रेडरची दर पंधरा दिवसांनी कोरोना तपासणी करणे बंधनकारक आहे. मागील दहा दिवसांपासून बारामती नगर परिषद अतिक्रमण विभाग व पंचायत समिती आरोग्य विभागाकडून व्यापाऱ्यांच्या दारात जाऊन मालक व कामगार यांची अँटिजन तपासणी करण्याचे काम सुरू असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

बारामती शहरात राजर्षी शाहू महाराज कॉम्प्लेक्स येथे अँटिजन तपासणी करताना अधिकारी व व्यापारी.

२३०६२०२१-बारामती-०५

Web Title: In the shop of 386 people in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.