धानोरीत ट्रक लावण्यावरुन दुकानदारांमध्ये हाणामारी; तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 04:45 PM2020-10-29T16:45:14+5:302020-10-29T16:46:24+5:30

लाकडी फळीचा घाव वर्मी लागून एक दुकानदार गंभीर जखमी

Shopkeepers clash due to parking of trucks in Dhanori; three person arrested | धानोरीत ट्रक लावण्यावरुन दुकानदारांमध्ये हाणामारी; तिघांना अटक

धानोरीत ट्रक लावण्यावरुन दुकानदारांमध्ये हाणामारी; तिघांना अटक

googlenewsNext

पुणे : दुकानासमोर ट्रक उभा करण्यावरुन दोन दुकानदारांमध्ये हाणामारी झाली. त्यात लाकडी फळीचा घाव वर्मी लागून एक दुकानदार गंभीर जखमी झाला. याप्रकरणी मोहन अगरवाल (वय ५३, रा़ विश्रांतवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुनिल हरीराम वर्मा (वय ३१), सुभाष हरीराम वर्मा (वय ४१) आणि अजित काशिराम वर्मा (वय १९, तिघे रा़ धानोरी) यांना अटक करण्यात आली आहे. 

मोहन अगरवाल व त्यांचा थोरला भाऊ धरमपाल यांचे मेणबत्ती व आगरबत्ती बनविण्याचे शेड आहे. त्यांच्या शेजारी वर्मा ग्लासेसचे मालक सुभाष वर्मा यांचा कारखाना आहे. वर्मा यांच्या कारखान्याचा माल घेऊन २८ ऑक्टोबरला ट्रक आला़ तो अगरवाल यांच्या शेडसमोर उभा होता. त्यामुळे अगरवाल यांच्या कारखान्याचा माल घेऊन ट्रक आल्याने तेथे रस्ता अरुंद असल्याने फिर्यादीचा मालाचा ट्रक शेडमध्ये येऊ शकत नसल्याने धरमपाल याने त्यांचे शेडसमोर जाऊन त्यांना त्यांचे मालाचा ट्रक पुढे घेण्यास सांगितले. तेव्हा सुभाष वर्मा याने ट्रक काढून घेत नाही, तुला काय करायचे ते कर, माझे जे नुकसान होईल ते तु देणार आहे का, देणार नसशील तर गाडी काढत नाही़ असे बोलून शिवीगाळ करुन लागला. त्यावेळी सुभाष वर्मा व त्यांचा भाऊ सुनिल वर्मा यांनी फिर्यादी यांचे भावास पाठीमागून धरुन ठेवून त्यांचा भाचा अजित वर्मा याने लाकडी फळी घेऊन धरमपाल यांच्या डोक्यात मारुन व हाताने मारहाण करुन जखमी केले. त्यांचा आवाज ऐकून मोहन अगरवाल तेथे गेले असताना सुनिल वर्मा याने तेथे पडलेला काचेचा तुकडा घेऊन फिर्यादीला मारण्यास आला. तो काचेचा तुकडा मोहन यांच्या हाताला लागून त्यांना जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक संतोष वाघमारे अधिक तपास करीत आहेत. 

Web Title: Shopkeepers clash due to parking of trucks in Dhanori; three person arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.