एमआरपीपेक्षा एक रुपया जास्त घेणं दुकानदारांना भोवलं : ५२ जणांवर कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 07:11 PM2019-01-28T19:11:41+5:302019-01-28T19:14:29+5:30

बुटाची रक्कम तीन हजार आणि ९९९ रुपये असताना दुकानदारांनी ग्राहकांकडून चार हजार रुपये घेणा-यावर वैध मापन विभागाने कारवाई केली आहे

Shoppers have taken more one rupee more than MRP: action taken on 52 people | एमआरपीपेक्षा एक रुपया जास्त घेणं दुकानदारांना भोवलं : ५२ जणांवर कारवाई 

एमआरपीपेक्षा एक रुपया जास्त घेणं दुकानदारांना भोवलं : ५२ जणांवर कारवाई 

Next

पुणे : बुटाची रक्कम तीन हजार आणि ९९९ रुपये असताना दुकानदारांनी ग्राहकांकडून चार हजार रुपये घेणा-यावर वैध मापन विभागाने कारवाई केली आहे. एमआरपीपेक्षा जास्त एक रुपये जास्त घेणा-या बुटाच्या दुकानदारांना चांगलेच भोवले आहे. एप्रिल महिन्यापासून डिसेंबर पर्यंत एमआरपी पेक्षा जास्त रक्कम घेणा-या ५२ जणांवर पुणे विभागीय वैध मापन विभागाने कारवाई केली.

             पाण्याच्या बॉटल एमआरपीपेक्षा जास्त रुपयांने विकणे, कोल्डींगची बॉटल दोन रुपये जास्त रुपयांनी विकणे, मोबाईल रिचार्ज केल्यानंतर सुट्टे पैसे न देणे, अशा  वेगवेगळ्या बहाण्याने दुकानदार ग्राहकांकडून एमआरपी पेक्षा जास्त रक्कम घेत असतात. पुणे-मुंबई एक्सप्रसे हायवे, पुणे-सातारा, पुणे-सोलापुर, पुणे-अहमदनगर, नाशिक महामार्गावरील हॉटेल, स्वीट मार्ट, जनरल स्टोअर, विविध प्रकारचे दुकानदार, मॉल, कपडयाचे दुकानांमध्ये एमआरपी पेक्षा जास्त रक्कम घेण्याचे प्रकार सर्सार होतात. ग्राहक घरी किंवा कामाच्या ठिकाणी लवकर पोहचायचे असल्याने महामार्गावरील दुकानदाराशी ग्राहक हुज्जत घालत नाही. तसेच एक दोन रुपयांसाठी तक्रार का करायची, तक्रार केल्यानंतर वैध मापन विभागाच्या कार्यालयामध्ये चकरा माराव्या लागतील. दोन रुपयांनी काय बिघडते असे विचार करून अनेकदा ग्राहक एमआरपी पेक्षा रक्कम घेणा-याची तक्रार करत नाही. 

            याबाबत पुणे विभागाचे वैध मापन विभागाचे उपनिंयत्रक अधिकारी  सीमा बैस यांनी सांगितले की, दरम्यान, गेल्या एप्रिल पासून डिसेंबरपर्यंत एमआरपी पेक्षा जास्त रक्कम घेणा-या ५२ जणांवर वैधमापन विभागाने कारवाई केली आहे. तसेच पॅकिंगमध्ये वजनापेक्षा कमी माल देऊन ग्राहकांना लुटणा-या दहा जणांवर कारवाई केली आहे. नागरिकांनी एमआरपी  पेक्षा जास्त रक्कम घेणा-यांची तक्रार वैध मापन विभागाकडे करावी. 

Web Title: Shoppers have taken more one rupee more than MRP: action taken on 52 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.