दिवाळीची खरेदी : प्लॅस्टिक मनीच्या वापरात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 01:01 AM2018-11-07T01:01:32+5:302018-11-07T01:02:44+5:30
दिवाळी गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वजण ऐपतीप्रमाणे साजरा करतात. मात्र औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनी दिलेल्या आॅनलाइन खरेदी व मॉलच्या गिफ्ट कुपनमुळे ग्रामीण भागातील ग्राहकांचाही शहरी मॉलकडे ओढा वाढला आहे.
आसखेड : दिवाळी गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वजण ऐपतीप्रमाणे साजरा करतात. मात्र औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनी दिलेल्या आॅनलाइन खरेदी व मॉलच्या गिफ्ट कुपनमुळे ग्रामीण भागातील ग्राहकांचाही शहरी मॉलकडे ओढा वाढला आहे. त्यामुळे यंदा प्लॅस्टिक मनीचा वापर वाढला आहे. मात्र ग्रामीण भागातील व्यवसायिकांचा धंदा मंदावला आहे.
निघोजे, महाळुंगे, वासुली, वराळे, सावरदरी या औद्योगिक वसाहतीत कामास राहणाऱ्या लोक वासुली फाट्यावरच (चाकणपासून ११ किमी) खरेदी करत असतात. सुमारे ४००-५०० व्यावसायिकांना त्याचा फायदा होत असतो. दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड दरवर्षी बाजारपेठेत उडते, पण यावर्षी चाकण परिसरातील व्यावसायिकांना वेगळाच अनुभव आला आहे. सणाच्या खरेदीसाठी व्यावसायिकांनी दुकाने सजवली खरी, मात्र दिवाळीआधी व नंतरही ग्राहकांनी दुकानांकडे पाठ फिरवली आहे. मात्र त्याचे कारण दुष्काळ नसून कंपन्यांनी दिलेली गिफ्ट कुपन्स ही आहेत. कुपनमुळे रोजचे गिºहाईक पिंपरी चिंचवडकडे जात असल्याने त्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. चाकण परिसर हा औद्योगिक वसाहत म्हणून प्रसिद्ध आहे. परिसरात सुमारे हजार ते बाराशे छोटे मोठे उद्योग, आॅटो हब, कांदा बाजार, जनावरांचा बाजार असल्याने प्रचंड आर्थिक उलाढाल होत असते. औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार याच परिसरात स्थायिक आहेत.
दरवर्षी कंपन्याकडून कामगारांना दिवाळी बोनस वाटप केले जाते. त्यामुळे आर्थिक उलाढालीत वाढ होते. यंदाही बोनस दिला, मात्र रोख स्वरूपात रक्कम जमा न करता बहुतांश कंपन्यांनी कामगारवर्गाला ‘गिफ्ट व्हाऊचर’ कूपन बोनस म्हणून दिली आहेत. त्यामुळे ‘प्लॅस्टिक मनी’चा वापर यावर्षी प्रचंड वाढला आहे.
बोनस व्हाऊचर शहरी भागातील काही मॉलमध्येच उपयोगात आणता येणार असल्याने कामगारांनी यावर्षी कपडे व इतर खरेदीसाठी पुणे, पिंपरी-चिंचवडला जाण्यास पसंती दर्शविली आहे. परिणामी ‘प्लॅस्टिक मनी’चा वापर यावर्षी प्रचंड वाढला आहे. मात्र त्याचा परिणाम ग्रामीण भागातील व्यापाºयांवर झाला आहे.
ग्रामीण व रोख बाजारपेठेकडे ग्राहकांची पाठ
रोख स्वरूपात खरेदी करणाºयांची बाजारपेठेत प्रकर्षाने उणीव जाणवत आहे. फटाका विक्री करणाºया स्टॉलधारकांना परवाना मिळवण्यासाठी अतोनात परिश्रम घ्यावे लागल्याने फटाका स्टॉल उशिरा सुरू झाले. पोलीस यंत्रणेनेही फटाका स्टॉलच्या नियमांकडे लक्ष दिले. दुर्घटना होऊ न म्हणून विना परवानाधारकांवर कारवाई करणार, अशा सूचना दिल्या. त्यामुळे त्यांच्याकडेही गिºहाईकांचा अभाव आहे. कापड दुकानदार, मिठाईवालेही ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. समाधानाची बाब एवढीच की सराफ बाजारात खरेदी-विक्री उलाढाल अंशत: वाढली आहे. वाढत्या महागाईमुळे फराळाचे पदार्थ घरी करण्याऐवजी आयते घेण्याकडे महिला वर्ग वळला आहे.