दुकाने उघडणार, पुण्यातील व्यापाऱ्यांचे सरकारला खुले आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:11 AM2021-04-08T04:11:55+5:302021-04-08T04:11:55+5:30

राज्य सरकार व पुणे महापालिका प्रशासनाने मिनी लॉकडाऊन नियमावलीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे. ...

Shops to open, traders in Pune openly challenge the government | दुकाने उघडणार, पुण्यातील व्यापाऱ्यांचे सरकारला खुले आव्हान

दुकाने उघडणार, पुण्यातील व्यापाऱ्यांचे सरकारला खुले आव्हान

Next

राज्य सरकार व पुणे महापालिका प्रशासनाने मिनी लॉकडाऊन नियमावलीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे. या निर्णयाविरोधात व्यापारी वर्गांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.पुणे व्यापारी महासंघातर्फे दोन दिवसीय तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे.त्याचाच एक भाग म्हणून पुणे शहरातील दुकाने शुक्रवारी उघण्यात येणार आहे.

या आंदोलनानंतरही राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाने आपला निर्णय मागे घेतला नाही तर सोमवारपासून नियमित दुकाने उघडण्यात येणार असल्याचा इशाराही पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिला आहे.

पुणे व्यापारी संघाच्या पदाधिकारी व सदस्य यांच्यात बैठकीत आयोजित करण्यात आली. त्यावेळी बैठकीत निर्णय घेतला आहे. रांका म्हणाले, आज पुणे व्यापारी वर्गाच्या सदस्य आणि पदाधिकाऱ्यांमध्ये एक बैठक झाली. त्यात उग्र भावना व्यक्त करण्यात आल्या. या बैठकीत दोन दिवसीय आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यात गुरुवारी(दि. ७) विजय टॉकीज ते क्वार्टर गेटपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा व्यापारी सदस्य निषेधाचा फलक सोबत दंडावर काळी फित लावून निषेध नोंदविणार आहे. आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणजे शुक्रवारी (दि. ८) सकाळी साडे आठ वाजता दुुकाने उघडतील आणि सायंकाळी ६ वाजता बंद करतील. यावेळी पोलीस किंवा प्रशासकीय अधिकारी यांना जी कारवाई करायची आहे ती त्यांनी करावी. मात्र या कारवाईवेळी व्यापारी वर्ग एकत्रित होऊन संबंधित व्यापाऱ्याच्या पाठीशी उभा राहिल.

Web Title: Shops to open, traders in Pune openly challenge the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.