शनिवार-रविवारीही आता दुकाने उघडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:10 AM2021-05-29T04:10:02+5:302021-05-29T04:10:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाबाधितांच्या संख्येत झालेली घट लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने पुणेकरांना दिलासा दिला आहे. शनिवारपासून (दि. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाबाधितांच्या संख्येत झालेली घट लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने पुणेकरांना दिलासा दिला आहे. शनिवारपासून (दि. २९) आठवड्याचे सातही दिवस सकाळी सात ते अकरा यावेळेत अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
लॉकडाऊन शिथिल केल्याचा नवा आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शुक्रवारी (दि. २८) काढला. एप्रिलच्या १४ तारखेपासून पुण्यात दर आठवड्याच्या शनिवार-रविवारी पूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने अत्यावश्यक सेवाही बंद ठेवल्या जात होत्या.
अत्यावश्यक सेवांमध्ये वैद्यकीय सेवांसह किराणा, भाजीपाला, फळविक्री दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई व सर्व प्रकारची खाद्यपदार्थांची दुकाने (मटन, चिकन, अंडी, मासे विक्री दुकानांसह) उघडी ठेवता येणार आहेत. याचबरोबर पाळीव प्राण्यांच्या खाद्याची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामाकरिता नागरिक अथवा संस्थांसाठी साहित्याची निर्मिती करणारी दुकाने, चष्म्याची दुकाने यांचाही समावेश आहे.
-------------------------------