डॉ हेमा साने यांच्या जीवनावरील लघुपटाला पुरस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 03:35 PM2019-08-10T15:35:06+5:302019-08-10T15:37:10+5:30

 पुण्यातील ज्येष्ठ  वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांच्या जीवनपद्धतीवर निर्मित केलेल्या ‘ग्लो वॉर्म इन अ जंगल’ या  माहितीपटासाठी रमणा दुम्पाला (दिग्दर्शन विभाग)  तर सार्थक भासीन याने दिग्दर्शित केलेल्या  ‘एकांत’ लघुपटाच्या कला दिग्दर्शनासाठी नीरज सिंग अशा  दोघांनी विशेष उल्लेखनीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली आहे.

Short film based on Dr. Hema Sane got national award | डॉ हेमा साने यांच्या जीवनावरील लघुपटाला पुरस्कार 

डॉ हेमा साने यांच्या जीवनावरील लघुपटाला पुरस्कार 

googlenewsNext

पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) च्या दोन विद्यार्थ्यांच्या कलाकृतींना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.  पुण्यातील ज्येष्ठ  वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांच्या जीवनपद्धतीवर निर्मित केलेल्या ‘ग्लो वॉर्म इन अ जंगल’ या  माहितीपटासाठी रमणा दुम्पाला (दिग्दर्शन विभाग)  तर सार्थक भासीन याने दिग्दर्शित केलेल्या  ‘एकांत’ लघुपटाच्या कला दिग्दर्शनासाठी नीरज सिंग अशा  दोघांनी विशेष उल्लेखनीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली आहे.


केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे ६६ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये एफटीआयआयच्या या दोन विद्यार्थ्यांच्या कलाकृतीला राष्ट्रीय पुरस्कार  मिळाला आहे. रमणा दुम्पाला हा मूळचा हैदराबादचा. तो एफटीआयआयच्या दिग्दर्शन विभागाचा विद्यार्थी.  रमणा दुम्पाला याने माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबददल ‘लोकमत’शी बोलताना आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, की यापूर्वी  डॉ. साने यांच्यावर कुणी माहितीपट कसा निर्मित केला नाही, याचे आश्चर्य वाटले. डॉ. हेमा साने यांच्या घरी गेल्यावर आपण केवळ विद्यार्थी असून, तुमचे जीवन जाणून घेण्याची इच्छा असल्याचे सांगितले. त्याला त्यांनी होकार दिला. त्यांनी अत्यंत मनमोकळेपणाने आपला जीवनप्रवास कथन केला. वीज न वापरणे हा डॉ. हेमा साने यांच्या जीवनपद्धतीचा एक भाग आहे. त्याला कुठेही धक्का लागू नये, यासाठी संपूर्ण माहितीपटाचे विनालाईट शूटिंग करण्यात आले. निसर्गाच्या आणि पशुपक्ष्यांच्या सान्निध्यात आपले लिखाण आणि वाचन करण्याचे काम त्या करतात. हा माहितीपट पूर्ण झाल्यानंतर त्यांना दाखविण्यात आला. त्यांना खूप आनंद झाला आणि कामाचे चीज झाल्यासारखे वाटले. त्यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याचे वृत्त कळविल्यानंतर त्यांनी कौतुक केले.

Web Title: Short film based on Dr. Hema Sane got national award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.