पर्यावरण जागृतीसाठी लघुपट हे प्रभावी माध्यम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:10 AM2021-01-14T04:10:09+5:302021-01-14T04:10:09+5:30
मेघराज राजेभोसले : राज्यस्तरीय पर्यावरण लघुपट महोत्सवाच्या पारितोषिक वितरण मेघराज राजेभासले : राज्यस्तरीय पर्यावरण लघुपट महोत्सवाच्या पारितोषिक वितरण पुणे ...
मेघराज राजेभोसले : राज्यस्तरीय पर्यावरण लघुपट महोत्सवाच्या पारितोषिक वितरण
मेघराज राजेभासले : राज्यस्तरीय पर्यावरण लघुपट महोत्सवाच्या पारितोषिक वितरण
पुणे : ‘पर्यावरणाचा र्हास ही समाजासाठी अत्यंत चिंतेची बाब आहे. तरुण पिढीमध्ये पर्यावरणासंदर्भात जागृती करणे गरजेचे असून, या दृष्टीने लघुपट हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे,’ असे मत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभासले यांनी व्यक्त केले.
राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पुणे महापालिका, माय अर्थ फाउंडेशन, सस्टेनेबल इनिशिएटिव्ह, एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया आणि ध्यास प्रतिष्ठानतर्फे आयोजित राज्यस्तरीय पर्यावरण लघुपट महोत्सवाच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. दिग्दर्शक नितीन सुपेकर, लिज्जत पापड उद्योग समूहाचे संचालक सुरेश कोते, पुणे मनपा पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, ईसीआयचे सदस्य दत्तात्रय देवळे, किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे वीरेंद्र चित्राव, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे, वनराईचे सचिव अमित वाडेकर, संयोजक अनंत घरत, अमोल उंबराजे, ललित राठी सोमनाथ पाटील उपस्थित होते.
महापालिकेने कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी, यासाठी तयार केलेला ‘संकल्प’ आणि पी. के भांडवलकर यांचा ‘मांजा’ हे लघुपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरले. ‘अॅडिक्शन’ या लघुपटासाठी अक्षय वासकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. सुनील डांगे यांच्या अवनी हा सर्वोत्कृष्ट माहितीपट ठरला. ‘प्लॅस्टिक वेस्ट मॅनेजमेंट’ या लघुपटाची संकल्पना सर्वोत्कृष्ट ठरली. हितेंद्र सोमानी यांचा ‘सुरक्षित भविष्य’ हा लघुपट सर्वोत्कृष्ट अॅनिमेशनपट ठरला. ‘जीवाश्म’ या लघुपटासाठी जितेंद्र घाडगे यांना सर्वोत्कृष्ट संवादलेखनाचे, सचिन मंगज यांना ‘हिरवी आशा’ लघुपटाच्या छायाचित्रीकरणासाठी पारितोषिक मिळाले. ‘गिफ्ट’, ‘अदृश्य’ आणि ‘कचरा विलगीकरण’ या लघुपटांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
सोमनाथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अनंत घरत यांनी प्रास्ताविक केले. अमोल उंबराजे यांनी आभार मानले. ज्येष्ठ लेखक सुभाषचंद्र जाधव यांनी महोत्सवाच्या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले.