लॉकडाऊनमुळे शेतमजुरांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:10 AM2021-04-16T04:10:08+5:302021-04-16T04:10:08+5:30

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. बारमाही बागायत पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निमोणे परिसरातही मोठ्या कोरोनाचे संक्रमण होत आहे. ...

Shortage of agricultural labor due to lockdown | लॉकडाऊनमुळे शेतमजुरांचा तुटवडा

लॉकडाऊनमुळे शेतमजुरांचा तुटवडा

Next

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. बारमाही बागायत पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निमोणे परिसरातही मोठ्या कोरोनाचे संक्रमण होत आहे. त्यमुळे अनेक निर्बंध लागू केले आहे. गेल्यावेळीही लॉकडाऊन लावला होता. त्यावेळी शेतमजुरांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. शेतमालकाकडून कोणत्याही प्रकारची सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याने अनेक अडचणींना या मजुरांना समोरे जावे लागले होते. सध्याच्या निर्बंधांची धास्ती या शेतमजुरांनी घेतली आहे. त्यामुळे अनेक मजूर गावाकडे परतू लागले आहे.

सध्या खरीप हंगामपूर्व मशागत, उसाच्या खोडवा पिकाचे संवर्धन कांदा काढणी, भुईमूग पेरणी व खुरपणी, डाळींब द्राक्षे पिकांची छाटणी, भाजीपाला-पिकांची तोडणी अशी शेतीची कामे चालू आहेत. या सर्व कामांसाठी मजूर वर्गाची मोठी गरज असते . मुळातच या भागात औद्योगिक वसाहतीमुळे स्थानिक मजूर शेतीसाठी मिळतच नाहीत. विदर्भ, मराठवाडा याशिवाय अनेक परप्रांतीय मजूर या भागात स्थिरावले होते. मात्र, सध्या लागू केलेल्या निर्बंधांमुळे या भागातील बरेच मजूर आपापल्या गावी निघून गेलेले आहेत. तर स्थानिक मजूर संसर्गाच्या भीतिने घरीच बसून आहे. त्यामुळे शेतमालकांसमोर मजूरांच्या तुटवड्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या सावड पद्धतीने शेतीची कामे पूर्ण शेतकरी करत आहे. मात्र, हे प्रमाण नगण्य आहे.

परिसरात आजाराचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव असल्याने कोणीही कामासाठी यायला तयार नाही . त्यामुळे स्वतः च सर्व शेती कामे करावी लागतात .

- संदीप एलभर - द्राक्ष उत्पादक - मोटेवाडी.

Web Title: Shortage of agricultural labor due to lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.