उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत कोरोना लसीचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:10 AM2021-03-21T04:10:11+5:302021-03-21T04:10:11+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. दुसरीकडे लसीकरण मोहिमदेखील राबवण्यात येत आहे. सुरुवातील संथ गतीने होणाऱ्या लसीकरण मोहिमेने ...

Shortage of corona vaccine in Deputy Chief Minister's Katewadi | उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत कोरोना लसीचा तुटवडा

उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत कोरोना लसीचा तुटवडा

googlenewsNext

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. दुसरीकडे लसीकरण मोहिमदेखील राबवण्यात येत आहे. सुरुवातील संथ गतीने होणाऱ्या लसीकरण मोहिमेने आता वेग धरला आहे. नागरिक स्वत:हूनच प्राथिमक आरेाग्य केंद्रात लस घेण्यासाठी जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. बारामतीतही बाधितांच्या संख्येने शंभीरी ओलांडली आहे. त्यातच आता काही ठिकाणी लसीचा तुटवडा जाणवत असल्याचे समोर आले आहे. गुरुवारी अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडीतही कोरोना प्रतिबंध लस संपल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला केंद्रातील अधिकारी व कर्मचारी लस घेण्यासाठी येणाऱ्यांना नागरिकांना लस संपल्याचे सांगत होते. मात्र, त्यानंतर त्यांनी थेट केंद्राच्या बाहेर एक फलक लावण्यात आला. त्यावर कोव्हॅक्सीन लस संपलेली आहे. तरी लसीकरणासाठी कोणीही विचारणा करु नये, लस उपलब्ध झालेवर कळविण्यात येईल असा संदेश लिहिण्यात आला. या प्रकरामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

काटेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर लावलेल्या या फलकाचा फोटो साेशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. ही बाब जेव्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आली आहे. त्यावेळी त्यांनी शुक्रवारी रात्री हा फलक काढून टाकला. एवढेच नाही तर सोमवारपर्यंत लस उपलब्ध होणार असून लस उपलब्ध झाल्यावर नागरिकांना कळविण्यात येईल असे अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे.

Web Title: Shortage of corona vaccine in Deputy Chief Minister's Katewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.