Mucormycosis: राज्यात म्युकोरमायकॉसिस चा औषधांचा तुटवडा मात्र केंद्रालाच इंजेक्शन पुरवण्याचे अधिकार : उपमुख्यमंत्री अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 01:55 PM2021-05-21T13:55:41+5:302021-05-21T13:57:16+5:30
एकट्या पुण्यात म्युकोरमायकॉसिस चे 300 रुग्ण. पवारांची माहिती. लॉकडाऊन बाबत आज निर्णय नाही.
राज्यात म्युकोरमायकॉसिसचा इंजेक्शन चा तुटवडा आहे. इंजेक्शन चा वितरणाचे सर्व अधिकार मात्र केंद्राने आपल्याकडे घेतले असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. एकट्या पुण्यातच म्युकोरमायकॉसिस चे 300 रुग्ण असल्याचं त्यांनी सांगितलं. लॉकडाऊन बाबत 10 दिवसांनी परिस्थीती पाहून निर्णय घेऊ असही पवार म्हणाले.
पुण्यामध्ये आज अजित पवार यांनी कारोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर बोलताना पवार यांनी ही माहिती दिली आहे. पवार म्हणाले ,"जिल्ह्यात 300 पेक्षा जास्त ब्लॅक फंगस चे रुग्ण. त्याचा इंजेक्शन चा तुटवडा. राज्याचा वतीने या आजाराचा इंजेक्शन ची मागणी केली आहे. त्याचा निर्मात्या कंपन्यांना आम्ही संपर्क केला पण त्यांनी सांगितलं की सगळी इंजेक्शन केंद्राला द्यायला सांगितली आहेत.
फक्त पुण्याला 1800 इंजेक्शन लागतायत. इतकी उपलब्धता नाही. नरेंद्र मोदींचा कानावर ही गोष्ट घालण्यात आली आहे. त्यात काही तरी मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे. "
रुग्ण संख्या आटोक्यात येत असतानाच परिस्थीती सुधारली असल्याचा दावा देखील पवार यांनी केला."आता बाकी तुटवडा कमी. पवार साहेबांनी आवाहन केलं तसं साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती सुरू झालेली आहे. दुसऱ्या लाटेचा संदर्भातली चिंता संपली. राज्यात 3000 मेट्रिक टन ऑक्सिजन तयार व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचे प्रयत्न.तिसरी लाट राज्यात येऊच नये असे प्रयत्न करूया. पण आली तर त्यासाठी तयारी केली आहे. लहान मुलांसाठी सेंटर करायला सुरुवात झाली आहे. "
संख्येत दिलासा मिळाला असल्याने लॉकडाउन शिथिल केला जाईल का याबाबत विचारल्यावर पवार म्हणाले ,"अजून 10 दिवस काय होतंय ते बघून निर्णय घेऊ. आत्ता जसं चालू आहे तसं चालू आहे. "
लसींचा तुटवडा अजूनही कायम असून अधिक पुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं."लसीचा जसा पुरवठा व्हायला पाहिजे. महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण पुण्यात झाल आहे. केंद्राकडे पाठ पुरावा करणे सुरू आहे. पुणे महापालिकेने ग्लोबल टेंडर काढलं. मुंबई महापालिकेने ग्लोबल टेंडर काढलं. आता कंपन्या देखील प्रोडक्शन वाढवले आहे. परदेशातून येणाऱ्या लसीचे वितरण कसे करायचे हा केंद्राचा निर्णय. " असं पवार म्हणाले.