Blood Shortage: पुण्यात रक्ताचा तुटवडा...! दहा दिवसांपासून रक्तदान शिबिरही नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 09:17 AM2022-11-16T09:17:30+5:302022-11-16T09:17:40+5:30

शहरामध्ये डेंग्यू आणि मलेरियासारख्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने त्यांना रक्तातील आरडीपी व एसडीपीसारख्या घटकांची मोठी गरज

Shortage of blood in Pune There is no blood donation camp for ten days | Blood Shortage: पुण्यात रक्ताचा तुटवडा...! दहा दिवसांपासून रक्तदान शिबिरही नाही

Blood Shortage: पुण्यात रक्ताचा तुटवडा...! दहा दिवसांपासून रक्तदान शिबिरही नाही

googlenewsNext

पुणे : दिवाळी सण आणि त्यानंतर असणाऱ्या सुट्या यामुळे विविध संस्थांकडून या काळात रक्तदान शिबिर घेण्याचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे गेल्या दहा दिवसांमध्ये एखादा अपवाद वगळता एकही रक्तदान शिबिर पुण्यात झाले नाही. त्यामुळे रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याची माहिती रक्ताचे नाते ट्रस्टचे संचालक राम बांगड यांनी दिली.

बांगड म्हणाले, पुण्यामध्ये दररोज सुमारे एक हजार चारशे बॅॅग रक्ताची गरज असते. मात्र, गेल्या १० दिवसांत अपवाद वगळता रक्तदान शिबिर झाले नाही. त्यामुळे सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. दुसरीकडे शहरामध्ये डेंग्यू आणि मलेरियासारख्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने त्यांना रक्तातील आरडीपी व एसडीपीसारख्या घटकांची मोठी गरज असते.

एका रुग्णालयात एका रक्तपिशवीतून अगदीच तुटक आरडीपी व एसडीपी घटक मिळतात. त्यामुळे त्यांची गरज भागविण्यासाठी चार पिशव्यांतील रक्तातील घटक एकत्र करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे सध्या डेंग्यू व मलेरिया रुग्णांच्या नातेवाइकांची रक्त शोधण्यासाठी धावपळ सुरू आहे.

 सरकारी रुग्णालयात करा रक्तदान

शहरामध्ये ससून आणि पिंपरी चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात सरकारी रक्तपेढी आहे. अन्य रक्तपेढ्यांची नोंदणी जरी धर्मादाय कार्यालयात झाली असली तरी गरीब रुग्णांना परवडेल अशा किमतीत रक्त दिले जात नाही. रक्त विक्रीचा व्यवसाय केला जातो. त्यामुळे नागरिकांनी रक्तदानासाठी सरकारी रक्तपेढ्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहनही राम बांगड यांनी केले.
 
''ए पॉझिटिव्ह रक्तगटाची सध्या एकही पिशवी नाही. इतर गटांचे रक्तसुद्धा पुरेसे नाही. प्लेटलेट्सच्या पिशव्याही नाहीत. त्यामुळे रक्ताचा तुटवडा स्पष्ट जाणवतो आहे. दिवाळीनंतर रक्तदान शिबिर कमी झाल्याने हा तुटवडा तीव्रतेने जाणवत असून, रक्तदान शिबिरे वाढविण्याची गरज आहे. -डॉ. सोमनाथ खेडकर, ससून रुग्णालय.''

''गेल्या सहा दिवसांमध्ये छोटी-छोटी शिबिरे झाली. त्यामुळे बऱ्यापैकी पिशव्या जमा झाल्या आहेत. दिवाळीच्या दिवसांत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या मोठ्या आयटी इंडस्ट्रीत वर्क फ्राॅम होम कल्चर सुरू असल्याने मोठे शिबिर हाेत नाहीत. -किशोर धुमाळ, जनसंपर्क अधिकारी, केईएम रक्तपेढी.'' 

Web Title: Shortage of blood in Pune There is no blood donation camp for ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.