पुण्यातील ग्रामीण भागात CNG चा तुटवडा, पंपावर लांबच्या लांब रांगा
By राजू हिंगे | Published: May 14, 2023 02:56 PM2023-05-14T14:56:31+5:302023-05-14T14:57:43+5:30
सीएनजीचा पुरवठा मागणीप्रमाणे होत नसल्याने इंधन तुटवडा निर्माण झाल्यानं वाहनधारकांना दुहेरी संकट
पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सीएनजी पंपावर सीएनजीचा तुटवडा निर्माण होत आहे. पेट्रोल, डिझेलप्रमाणे सीएनजीच्या दरानेही ८६ पार केलेली असताना दुसरीकडे पंपावर सीएनजीचा पुरवठा मागणीप्रमाणे होत नसल्याने इंधन तुटवडा निर्माण झाल्यानं वाहनधारकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. यामुळे वाहन चालकांना सीएनजी पंपावर कधी लांबच्या लांब रांगांमुळे वेळेच्या अपव्ययासह तर कधी गॅस नसल्याने पंप बंद असल्याने मानसिक त्रास सोसावा लागत आहे.
सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्याने पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे वाहनचालकांचा वेळेच्या अपव्ययासह मानसिक त्रास ही सहन करावा लागत असल्याने सीएनजी वाहनधारकच गॅसवर आहेत. मंचर, चाकण, खेड , इंदापूर शहरातील दोन्ही ठिकाणी सीएनजी पंप असल्याने चालकांची धावपळ उडत असल्याचे पाहायला मिळत आहे.