तंबीमुळे लागले वेळेत निकाल
By admin | Published: January 15, 2017 05:47 AM2017-01-15T05:47:24+5:302017-01-15T05:47:24+5:30
‘तुमच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासून द्या; अन्यथा तुमच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी पाठवून नका,’ अशी
पुणे : ‘तुमच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासून द्या; अन्यथा तुमच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी पाठवून नका,’ अशी तंबी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना दिल्यामुळे बहुतेक परीक्षांचे निकाल ३४ दिवसांच्या आत जाहीर झाले आहेत. तसेच, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे सर्व निकालही येत्या २६ जानेवारीपर्यंत प्रसिद्ध करणे शक्य झाले आहे.
प्राध्यापकांकडून उत्तरपत्रिका तपासणीला टाळाटाळ केली जाते. त्यामुळे निकालास विलंब होतो.
विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण म्हणाले, ‘‘अनेक परीक्षांचे निकाल ३४ दिवसांमध्ये जाहीर करणे शक्य झाले. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असूनही या परीक्षांच्या निकालाचे काम पूर्ण होत आले आहे. पूर्वी एका महाविद्यालयातील कॅप मध्ये २०० प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासणीसाठी येत होते; परंतु ही संख्या आता ६००पर्यंत गेल्याचे दिसून येत आहे.
‘‘प्राध्यापकांची संख्या वाढल्याने उत्तरपत्रिकांची तपासणी जलद
झाली. विधी अभ्यासक्रमाचे निकाल वेळेत जाहीर व्हावेत, यासाठी
विधी विद्याशाखेचे समन्वयक आणि अभ्यास मंडळांच्या सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली एक टास्कफोर्स तयार करण्यात आला होते.’’ (प्रतिनिधी)
- प्रथमवर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा बेसिक इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग या विषयाचा पेपर ९ डिसेंबर रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून फुटला होता. याबाबत पोलिसांचा तपास सुरू असून, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांचा जबाब नोंदविला आला आहे. पोलिसांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निकाल जाहीर करण्याबाबत बीओईमध्ये निर्णय घेतला जाईल, असे चव्हाण म्हणाले.