देशभरात तुटवडा; अफगाणिस्तानातून मागवला जातोय लसूण, प्रतिकिलोचे दर ५०० च्या पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 09:48 AM2024-11-26T09:48:59+5:302024-11-26T09:49:24+5:30

गेल्या हंगामात लसणाच्या उत्पादनात घट झाल्याने बाजारात लसणाचा तुटवडा जाणवत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले

shortages across the country; Garlic is being ordered from Afghanistan, the price of which is more than 500 per kg | देशभरात तुटवडा; अफगाणिस्तानातून मागवला जातोय लसूण, प्रतिकिलोचे दर ५०० च्या पुढे

देशभरात तुटवडा; अफगाणिस्तानातून मागवला जातोय लसूण, प्रतिकिलोचे दर ५०० च्या पुढे

पुणे: देशभरात लसणाचा तुटवडा जाणवत असल्याने लसणाला सध्या उच्चांकी दर मिळत आहेत. लसणाने दर ४०० रुपये पार केले आहेत. दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानातील लसूण आयात करण्यात येत आहे. अफगाणिस्तानातील लसूण मुंबई, दिल्ली, तसेच दक्षिण भारतातील बाजारपेठेत विक्रीस पाठविला जात आहे. अफगाणिस्तानातील लसूण आयात केल्याने दर नियंत्रित झाले आहेत. अन्यथा, किरकोळ बाजारातील लसणाच्या दरात मोठी वाढ होऊन प्रतिकिलोचे दर ५०० रुपयांच्या पुढे गेले असते, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

गेल्या हंगामात लसणाच्या उत्पादनात घट झाल्याने बाजारात लसणाचा तुटवडा जाणवत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी प्रमाणावर होत असल्याने लसणाला उच्चांकी दर मिळाले आहेत. किरकोळ बाजारात एक किलो लसणाचे दर ४०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. नवीन आवक सुरू होईपर्यंत पुढील दोन महिने दर तेजीत राहणार आहेत. अफगाणिस्तानातील लसूण आयात केल्याने दर नियंत्रित झाले आहेत, अशी माहिती मार्केट यार्डातील लसूण व्यापारी समीर रायकर यांनी दिली.

येथून होते लसूण आवक

लसणाची सर्वाधिक लागवड गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाबात होत असून या राज्यांतून महाराष्ट्रात आवक होत आहे.

लसणाचा हंगाम जानेवारी महिन्यात सुरू होतो. गेल्यावर्षी हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांकडे लसणाचा फारसा साठा नव्हता. त्यामुळे यंदा लसणाचे तेजीतील दर टिकून होते. लसणाचा हंगाम सुरू होण्यास दोन महिन्यांचा कालावधी आहे. मागणीच्या तुलनेत आवकही कमी प्रमाणावर होत असल्याने लसणाला उच्चांकी दर मिळाले आहेत. मार्केटयार्ड बाजारात परराज्यातून लसणाच्या पाच ते सात गाड्यांची आवक होत आहे. -समीर रायकर, व्यापारी

Web Title: shortages across the country; Garlic is being ordered from Afghanistan, the price of which is more than 500 per kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.