पोहण्यासाठी तलावाच्या मध्यभागात गेल्यावर लागला दम; भोरमधील कर्मचाऱ्याचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 06:06 PM2022-07-25T18:06:50+5:302022-07-25T18:07:15+5:30
भोईजल संघ भोरच्या पथकाने पाण्यात शोधमोहीम राबवून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या बाहेर मृतदेह बाहेर काढला
खेड शिवापूर : भोर महसूल विभागात कारकून काम पाहणारा कर्मचारी वर्वे येथे तलावात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुकुंद त्रिंबकराव चिरके वय ३५ . नसरापूर ( ता. भोर ) मूळगाव रा. जहागीरमोहा, ( ता. माजलगाव जि. बीड ) असे बुडालेल्या महसूल कर्मचाऱ्यचे नाव असून ही घटना सोमवारी ( दि. २५ ) रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास वर्वे खुर्द ( ता. भोर ) येथील तलावात ही घटना घडली आहे.
घटनेची माहिती समजतात तातडीने प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, मंडलधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली, विद्या गायकवाड, महसूल कर्मचारी, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जोशी सहाय्यक, उपनिरीक्षक उमेश जगताप, वर्वेचे सरपंच निलेश भोरडे, ग्रामसेविका शाहीन इनामदार तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते.
मुकुंद चिरके यांना ट्रेकिंगची आवड असल्याने ते रोज त्यांच्या मित्रा समवेत ट्रेकिंग व पोहण्यासाठी वर्वे या ठिकाणी जात असते. सोमवारी ते त्यांच्या मित्रांसमवेत वर्वे येथील तलावात पोहण्यासाठी गेले असता तलावाच्या मध्यभागी त्यांना दम लागला. यावेळी त्यांनी काठावर असलेल्या मित्रांना आवाज दिला. मात्र मित्र त्यांच्याकडे पोहोचेपर्यंत ते पाण्यात बुडाले. भोईजल संघ भोरच्या पथकाने पाण्यात शोधमोहीम राबवून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या बाहेर मृतदेह बाहेर काढला. एका युवकाच्या अशा जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.