शाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:09 AM2020-12-23T04:09:07+5:302020-12-23T04:09:07+5:30
अवसरी : आंबेगाव अवसरी खुर्द येथील खडकमळा येथे विदुयत वितरण कंपनीचे कर्मचारी विद्युत तारांची दुरूस्ती करत असताना शॉर्टसर्किट होऊन ...
अवसरी : आंबेगाव अवसरी खुर्द येथील खडकमळा येथे विदुयत वितरण कंपनीचे कर्मचारी विद्युत तारांची दुरूस्ती करत असताना शॉर्टसर्किट होऊन मानसिंग विश्वनाथ शिंदे यांचा काढणीला आलेला उस जाळून खाक झाल्याने मानसिंग शिंदे यांचे किमान १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मानसिंग शिंदे व स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.
अवसरी खुर्द गावच्या दक्षिणेला मानसिंग शिंदे यांचे दोन एकर क्षेत्र आहे. सतरा महिन्यांपूर्वी चंद्रशेखर हिंगे यांनी या क्षेत्रात भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याकडून ऊस बियाणे घेऊन ऊस लागवड केली होती व आता एक महिन्यात ऊस तोडणीला आला होता. शिंदे यांनी ऊस लागवड व खते औषधांसाठी अंदाजे एक लाख रुपये खर्च केला होता. त्यांच्या शेतातून जाणारी विद्युत तार तुटली होती, ती जोडण्यासठी स्थानिक वीज वितरणचे कर्मचारी मंगळवारी सकाळी १०.३० वाजता आले व त्यांनी घाई-घाईने तुटलेली तार जोडली व विद्युत प्रवाह चालू केला. त्यानंतर लगेचेच तारेतून सार्क झाला व ऊसाने पेट घेतला. ऊस मोठ्या प्रमाणात जाळल्याने आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे पुर्णपणे ऊस जळून खाक झाला. या घटनेनंतर तलाठी व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अधिकारी घटना स्थळी दाखल झाले मात्र वीरज कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे ऊस जळाला तरी एकही विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी घटनास्थळी पाहणीसाठी न आल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
--
फोटो : २२अवसरी ऊस जळाला
छायाचित्र मजकूर:
अवसरी खुर्द खडकमळा येथील मानसिंग विश्वनाथ शिंदे यांच्या शेतातील जळालेला उस