राजकीय वादातून सोमाटणेत गोळीबार

By Admin | Published: August 20, 2016 05:24 AM2016-08-20T05:24:25+5:302016-08-20T05:24:25+5:30

दोन गटांतील किरकोळ वादाचे जोरदार भांडणात रूपांतर होऊन सोमाटणे येथे गुरुवारी रात्री गावठी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. परस्परविरोधी फिर्यादीवरुन

Shot firing from political debate | राजकीय वादातून सोमाटणेत गोळीबार

राजकीय वादातून सोमाटणेत गोळीबार

googlenewsNext

शिरगाव : दोन गटांतील किरकोळ वादाचे जोरदार भांडणात रूपांतर होऊन सोमाटणे येथे गुरुवारी रात्री गावठी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. परस्परविरोधी फिर्यादीवरुन दोन्ही गटातील दोघांना अटक करण्यात आली असून, अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.
दोन्हीही गटांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात परस्परविरोधात तक्रार दाखल केल्या आहेत. प्रवीण सुनील मोरे ( वय १८) व प्रवीण रमेश शेडगे ( वय २३, सर्व रा. सोमाटणे, ता. मावळ, जि.पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांना वडगाव येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. योगराज मुऱ्हे, मयूर मुऱ्हे, मोरेश्वर उर्फ दादा पोकळे फरार असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फियार्दी प्रवीण रमेश शेडगे (वय २३) याने दिलेल्या फियार्दीनुसार, प्रवीण आणि सचिन मोरे दोघे चौराई देवी मंदिराच्या कठड्यावर गप्पा मारत बसले होते. या वेळी योगराज मुऱ्हे,मयूर मुऱ्हे,मोरेश्वर पोकळे, प्रवीण मोरे, अल्पवयीन आरोपी गाडीतून तेथे आले. त्यांनी आॅगस्ट २०१५ मधील ग्रामपंचायत निवडणुकीचा जुना वाद उकरून काढून शिवीगाळ सुरू केली. दोघात शाब्दिक बाचाबाची वाढल्याने झटापट झाली. यावेळी अल्पवयीन आरोपीने माझ्या डोक्यात बियरने भरलेली बाटली मारुन जखमी केले. त्यावेळी योगराज याने गावठी बनावटीचे पिस्तुल काढून रोखले.
ऋषिकेश दिनकर चव्हाण याने दिलेल्या फियार्दीनुसार, प्रवीण मोरे याला सोडण्यासाठी चौराई मंदिराजवळ गेलो. तेथे प्रवीण शेडगे व सचिन मोरे बसलेले होते. तेव्हा प्रवीण मोरेने आपला भाऊन सचिनला घरी जा असे अनेकदा सांगितल्याने प्रवीण शेडगे यास राग आल्याने दोघांची वादावादी झाली. तेव्हा मी आणि योगराजने गाडीतून खाली उतरून प्रवीण शेडगेने धारदार हत्यार माझ्या डोक्यात मारले. (वार्ताहर)

Web Title: Shot firing from political debate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.