असे असावे पालकत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:10 AM2021-04-10T04:10:59+5:302021-04-10T04:10:59+5:30

हळूहळू दोघांकडे असलेली झाडे वाढत होती. मात्र डॉक्टर साहेबांची झाडं एकदम भरगच्च आणि घनदाट वाढली होती, आणि आजोबांची झाडं ...

That should be parenting | असे असावे पालकत्व

असे असावे पालकत्व

googlenewsNext

हळूहळू दोघांकडे असलेली झाडे वाढत होती. मात्र डॉक्टर साहेबांची झाडं एकदम भरगच्च आणि घनदाट वाढली होती, आणि आजोबांची झाडं मात्र टुमदार, छान असली तरी अंग धरून होती.

एका रात्री अचानक जोराचा वारा आणि पाऊस आला. दुसऱ्या दिवशी बागेचं नेमकं काय घडलंय हे पाहायला दोघेही घराबाहेर आले. समोरच चित्र पाहून डॉक्टरला धक्काच बसला. कारण त्यांची सर्व झाडे अगदी मुळापासून उखडून पडली होती आणि आजोबांची मात्र छान शाबूत होती.

डॉक्टर विचारात पडले, भरपूर पाणी आणि मुबलक खत देऊनसुद्धा वाऱ्यात आणि पावसात माझ्या झाडांची अशी दशा आणि गरजेपेक्षा कमी गोष्टी मिळणाऱ्या आजोबांची झाडे जशीच्या तशी. शेवटी न राहून डॉक्टरने आजोबांना याचे कारण विचारले.

त्या आजोबांचे उत्तर...

डोळ्यात अंजन घालणारे होते !! आजोबा म्हणाले “तुम्ही झाडांना लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरविल्या पण अति प्रमाणात आणि त्यामुळेच झाडांची मुळे पोषणाच्या शोधार्थ खोलवर गेली नाहीत. तेच मी माझ्या झाडांना गरजेपुरतेच किंवा थोडे कमी खत आणि पाणी दिले, त्यामुळेच त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झाडांची मुळे खोलवर गेली. तुमच्या झाडाची मुळे खोलवर गेली नसल्याने थोड्याश्या वाऱ्याला आणि पावसाला बळी पडले. माझ्या झाडांची मुळे खोलवर गेल्याने त्यांना मजबुती मिळाली आणि वाऱ्याला आणि पावसाला न जुमानता माझी झाडे मस्त उभी आहेत.”

*आपल्या मुलांच्या बाबतीतही असेच असते... जितके जास्त जपाल तितके मुलांना कमकुवत कराल. निसर्गाने प्रत्येकाला लढण्याची शक्ती दिलेली असते. ती खच्ची करू नका. उलट थोडेफार ऊन वारा पाऊस त्याला सोसू द्या ! तरच तो मजबूत बनेल. मग जीवनात कितीही वादळे आली तरी तो पालकांच्या (खत पाण्यावर) भरोशावर जगणार नाही ! हेच खरे पालकत्व आहे !!!

Web Title: That should be parenting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.