...तर शासनानेच दूध खरेदी करावे- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 12:33 AM2018-05-26T00:33:57+5:302018-05-26T00:33:57+5:30

शासनाने दूध खरेदी दर प्रति लिटर २७ रुपये केला असून सहकारी संघांना त्याबाबत सक्ती केली आहे. याला दूध व्यावसायिकांनी विरोध केला आहे. त्यासाठी दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी पवार यांची बारामती येथे भेट घेऊन निवेदन दिले.

... should buy milk only by the government - Sharad Pawar | ...तर शासनानेच दूध खरेदी करावे- शरद पवार

...तर शासनानेच दूध खरेदी करावे- शरद पवार

Next
ठळक मुद्देइतर राज्यांप्रमाणे दूध खरेदीसाठी पाच रुपये अनुदान द्यावे, शालेय पोषण आहारात दुधाचा किंवा दूध पावडरचा समावेश करावा, प्लॅस्टिक बंदीमुळे दुग्ध व्यवसायापुढे निर्माण झालेल्या अडचणी तसेच दर सक्तीबाबत चर्चा करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शासनाकडून दूध खरेदी दराबाबत व्यावसायिकांना सक्ती केली जात असेल तर शासनानेच दूध खरेदी करून ते कोणाला द्यायचे त्यांना द्यावे, असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी दुध व्यावसायिकांसोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केले. या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
शासनाने दूध खरेदी दर प्रति लिटर २७ रुपये केला असून सहकारी संघांना त्याबाबत सक्ती केली आहे. याला दूध व्यावसायिकांनी विरोध केला आहे. त्यासाठी दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी पवार यांची बारामती येथे भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी संघाचे अध्यक्ष विनायक पाटील, उपाध्यक्ष गोपाळराव म्हस्के, सचिव प्रकाश कुतवळ, खजिनदार डॉ. विवेक क्षीरसागर, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे उपाध्यक्ष डी. के. पवार, संदीप जगताप, श्रीपाद चितळे, रणजितसिंह देशमुख, डी. व्ही. घाणेकर, जगन्नाथ पाटील आदी प्रतिनिधींचा समावेश होता.
इतर राज्यांप्रमाणे दूध खरेदीसाठी पाच रुपये अनुदान द्यावे, शालेय पोषण आहारात दुधाचा किंवा दूध पावडरचा समावेश करावा, प्लॅस्टिक बंदीमुळे दुग्ध व्यवसायापुढे निर्माण झालेल्या अडचणी तसेच दर सक्तीबाबत चर्चा करण्यात आली.

Web Title: ... should buy milk only by the government - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.