आर्थिक फसवणुकीला बळी पडू नये : प्रभाकर बुधवंत; सायबर गुन्ह्यांवर खडकीत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 02:43 PM2018-01-18T14:43:22+5:302018-01-18T14:47:14+5:30
आर्थिक फसवणुकीला कोणीही बळी पडू नये, असे मत पोलीस अधीक्षक प्रभाकर बुधवंत यांनी व्यक्त केले. लोहमार्ग पोलीस मुख्यालय खडकी येथील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ट्रॉन्सफार्मिंग महाराष्ट्र या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानी बोलत होते.
पुणे : नवीन पिढीमध्ये अँड्रॉइड मोबाइलमुळे इंटरनेटचे आकर्षण वाढत आहे. या इंटरनेटवर वेगवेगळ्या जाहिराती, बँकिंग आणि इन्शुरन्ससंबंधी दिशाभूल करणारी माहिती देऊन पैशाचे आमिष दाखवले जाते. या आर्थिक फसवणुकीला कोणीही बळी पडू नये, असे मत पोलीस अधीक्षक प्रभाकर बुधवंत यांनी व्यक्त केले. लोहमार्ग पोलीस मुख्यालय खडकी येथील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ट्रॉन्सफार्मिंग महाराष्ट्र या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानी बोलत होते.
यावेळी अक्सेस बँक आॅडिटर अशोक जॉन, अक्सेस बँक शाखा सॅलरी डिव्हिजन प्रसाद गायकवाड, सह पोलीस निरीक्षक सायबर सेल सागर पालबांडे, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदकुमार घोरपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी लोहमार्ग विभाग एन. एस. भोसले, सह पोलीस निरीक्षक समाधान पवार, पोलीस उपनिरीक्षक मकासरे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अनिल दबडे आदी उपस्थित होते. या सर्वांनी सायबर गुन्ह्यांची ओळख, प्रकार, सोशल मीडिया या संदर्भातील सायबर गुन्हे घडल्यानंतर काय करावे तसेच गुन्हे रोखण्याच्या उपाययोजना याबद्दल मार्गदर्शन केले.
बुधवंत म्हणाले, की इंटरनेटने सर्व क्षेत्रात प्रवेश केला आहे वाढत्या इंटरनेट वापराबरोबरच सायबर गुन्हेगारांनी गुन्हेगारीच्या नवनवीन पद्धती शोधून लोकांचा पैसा आणि खाजगी गोपनीयता याला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्याचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सक्षम आहे, परंतु नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
अशोक जॉन म्हणाले, की हॅकिंग, सायबर चोरी, आणि त्यावरील गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहे. तरुण पिढी आणि नागरिकांना हा खेळ वाटत आहे सर्वांनी मोबाईल जाणिपूर्वक वापरावा आणि सोशल मीडियावरील अनेक गोष्टींची काळजी घ्यावी.
सागर पालबांडे म्हणाले, की मोबाईल वापारताना आपल्या फेसबुक, ट्विटरचा पासवर्ड कोणाला सांगू नये. या सोशल मीडियावरील गोष्टींना सेक्युरिटी ठेवावी ज्यामुळे कुठलेही सायबर गुन्हे घडणार नाहीत.