शो मस्ट गो ऑन.. पुणे लिटररी फेस्टिव्हलचे कोरोनामुळे ऑनलाइन उदघाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:29 AM2020-12-12T04:29:25+5:302020-12-12T04:29:25+5:30
पुणे : देश-परदेशातील लेखक, विचारवंत आणि कलावंत यांच्या सहभागातून सजलेल्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलचे उदघाटन ऑनलाइन पद्धतीने हजारो प्रेक्षकांच्या ...
पुणे : देश-परदेशातील लेखक, विचारवंत आणि कलावंत यांच्या सहभागातून सजलेल्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलचे उदघाटन ऑनलाइन पद्धतीने हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडले. दरवर्षी यशदा येथे साकार होणारा फेस्टिव्हल यंदा कोरोनामुळे ’शो मस्ट गो ऑन’ नुसार फेसबुक, यूट्यूब आणि ६६६.स्र्र’ा.्रल्ल या वेबसाइटवर आयोजित केला आहे. या नव्या फॉर्ममधील फेस्टिव्हल आयोजनाला रसिकांनी पसंती दर्शविली.
विश्वकर्मा पब्लिकेशन्स आणि शोभा आटर्स सहप्रायोजक असलेल्या या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलच्या उदघाटनाप्रसंगी विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे चेअरमन भरत अगरवाल, चित्रपट दिग्दर्शक व फेस्टिव्हलच्या सल्लागार मंडळाचे सदस्य सिद्धार्थ जैन आणि महोत्सवाच्या संचालक डॉ. मंजिरी प्रभू उपस्थित होत्या.
भरत अगरवाल म्हणाले, लॉकडाऊन काळात साहित्यिक आणि वाचकांसाठी ‘पुस्तक ं’च मित्र आणि सहकारी बनले. पीआयएलएफ समाजामध्ये साहित्याचे महत्व पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. वाचक देखील दर्जेदार साहित्य, गुणवत्तापूर्ण लेखकांचे स्वागत करीत आहेत. पूर्वीपेक्षा हे ऑनलाइन माध्यम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल यात शंका नाही. प्रेक्षक आणि लेखक या ऑनलाइन माध्यमांचे नक्कीच कौतुक करतील.
सिद्धार्थ जैन म्हणाले, कोरोनामुळे सर्व जग बदलले आहे. सर्वांनी कोरोनामुळे हात टेकले पण पीआयएलएफ मध्ये तोच उत्साह टिकून आहे याचे कौतुक वाटते. शेवटी शो मस्ट गॉन. अनेक लेखक, कलाकारांनी हे नवीन ऑनलाइन माध्यम स्वीकारले आहे. विनित अलूरकर यांनी ‘इमँजिन ऑन धिस हेव्हन’हे गीत सादर केले. यावेळी पीआयएलएफच्या लोगोचे अनावरण केले.
साहित्यिकांशी थेट सन्मुख करणारा, साहित्याचे महत्त्व पटवून देणारा, विचारांना चालना देणारा आणि तरुणाईला साहित्याकडे वळवणारा महोत्सव अशी या साहित्य संमेलनाची ओळख आहे. फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी मास्टर क्लास, जर्मन लेखक लिओन हॉर्ड थॉमा यांचे व्याख्यान, वुमन पॉवरवर चर्चासत्र आदी कार्यक्रम पार पडले.