चुकीचा इतिहास दाखवणाऱ्या 'हर हर महादेव' चित्रपटाचे शो बंद पाडणार; संभाजी ब्रिगेड आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 13:10 IST2022-11-07T13:01:32+5:302022-11-07T13:10:08+5:30
पिंपरी-चिंचवड शहरात एकही शो चालू देणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे....

चुकीचा इतिहास दाखवणाऱ्या 'हर हर महादेव' चित्रपटाचे शो बंद पाडणार; संभाजी ब्रिगेड आक्रमक
पिंपरी : 'हर हर महादेव' या चित्रपटात इतिहासाची प्रचंड मोठया प्रमाणात बदनामी केली. त्यामुळे या चित्रपटाचे पिंपरी-चिंचवड शहरात दाखविण्यात येणारे शो आजपासून दाखविण्यात येऊ नयेत. नाहीतर हे शो संभाजी ब्रिगेडच्यावतीने बंद पाडण्यात येतील, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी दिला.
याबाबत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोमवारी (दि.०७) निवेदन देण्यात आले. निवेदनात महाराष्ट्राचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळयांचा आणि सरदारांच्या पात्रांचा इतिहास चुकीचा आणि मोडतोड करून दाखवण्यात आला आहे. त्यामुळे तमाम शिवप्रेमींच्या भावना तीव्र झालेल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात एकही शो चालू देणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.