राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने श्रद्धा वेताळ सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:08 AM2021-01-09T04:08:52+5:302021-01-09T04:08:52+5:30
याप्रसंगी आमदार संजय जगताप, शिक्षण संचालक दत्तात्रेय जगताप, परीक्षा सहसंचालक मीना शेंडकर, माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, शिक्षक संघाचे नेते ...
याप्रसंगी आमदार संजय जगताप, शिक्षण संचालक दत्तात्रेय जगताप, परीक्षा सहसंचालक मीना शेंडकर, माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, शिक्षक संघाचे नेते अर्जुन कोळी आदी उपस्थित होते.
श्रध्दा वेताळ यांनी वीस वर्षापेक्षा अधिक काळ सरकारी शाळांमध्ये उत्तम विद्यार्थी घडविले आहेत. सध्या बारामती नगरपालिकेअंतर्गत शाळा क्रमांक एकमध्ये अध्यापन करत आहेत. त्यांनी सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने विशेषतः सहावी ते आठवीच्या मुलींसाठी व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवून मुलींना स्वयंपूर्ण बनविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मुली ज्वेलरी, घरगुती वस्तू बनवायला शिकल्या. त्यांना श्रध्दा क्रिएशन नावाचा फेसबुक ग्रुप तयार करून वस्तू विक्रीसाठी सहकार्य केले. पुरस्काराबद्दल बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, प्रशासन अधिकारी पद्मजा दिंडे आदींनी श्रद्धा वेताळ यांचे अभिनंदन केले.
०८ सोमेश्वरनगर
श्रद्धा वेताळ यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड.