चित्रसृष्टीलाही श्रावण महिन्याची भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 03:18 AM2017-07-24T03:18:18+5:302017-07-24T03:18:18+5:30

‘घन घन माला नभी दाटल्या’, ‘श्रावणात घन निळा बरसला’, ‘रिमझिम झरती श्रावणधारा’, ‘ॠतू हिरवा, ॠतू बरवा’ अशी

Shravan month romance | चित्रसृष्टीलाही श्रावण महिन्याची भुरळ

चित्रसृष्टीलाही श्रावण महिन्याची भुरळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘घन घन माला नभी दाटल्या’, ‘श्रावणात घन निळा बरसला’, ‘रिमझिम झरती श्रावणधारा’, ‘ॠतू हिरवा, ॠतू बरवा’ अशी गाणी कानावर पडली की श्रावणाचे सौैंदर्य आपोआपच डोळ््यांसमोर खुलते. श्रावण महिन्याच्या आगमनाने अवघी सृष्टी हिरवागार शालू नेसून स्वागताला उभी ठाकते. श्रावणाचे हेच सौंदर्य आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व यापासून चित्रपटसृष्टी तरी कशी वेगळी राहू शकते. गेल्या अनेक दशकांपासून श्रावणी सोमवार, श्रावणातील सण, उत्सव आणि नैसर्गिक महत्त्व यावर आधारित
अनेक चित्रपट मराठीमध्ये येऊन गेले आहेत.
कृष्णधवल सिनेमांच्या काळापासूनच मराठी समाजमनावर असलेला धार्मिकतेचा पगडा रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आला आहे. श्रावणातील सोमवारचे व्रतवैकल्य केल्यामुळे घरातील अडचणी, संसारातील विघ्न दूर झाल्याचे कथानक असो वा श्रावणामध्ये घरामधील वयोवृद्ध तीर्थाटनासाठी घराबाहेर पडल्याची दृश्ये असोत श्रावणाशी संबंधित एक तरी गोष्ट सिनेमामध्ये असायचीच. त्याशिवाय प्रेक्षकांनाही सिनेमा आपलासा वाटत नसायचा. अलीकडच्या काळात हे चित्र बदलत चालले असले तरी टीव्हीवर जुने सिनेमे लागताच चाळीशी ओलांडलेले प्रौढ आजही आवर्जून हे सिनेमे
पाहतात.
श्रावणामध्ये विशेषत: महादेवाची उपासना केली जाते, हाच नेमका धागा पकडून अनेक सिनेमांमधून शिवभक्तीचा पूर्वापार चालत आलेला वारसाही मराठी सिनेमांमधून दाखविण्यात आला आहे. मंगळागौर, नागपंचमी, रक्षाबंधन सासुरवाशिणींना हवेहवेसे वाटणारे श्रावणातील हे सणही सिनेमांमध्ये आवर्जून दाखविले गेले आहेत. गोकुळाष्टमीसारखा तरुणांच्या आवडीचा सण अनेक सिनेमांच्या कथानकाच्या केंद्रस्थानी अनेक वर्षांपर्यंत होता.

एक दोन तीन चार हमालपुऱ्यातली पोरं हुशार’ हे गाणे किंवा शम्मी कपूरचे गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिजबाला हे गाणं असो आजही ही गाणी वाजवल्याशिवाय तरुणांचे मन भरत नाही.
केवळ आध्यात्मिक आणि भक्ती एवढ्यावरच मर्यादित न राहता, श्रावणातील ‘रोमॅन्टिक’ वातावरणही सिनेमांमधून दाखविण्यात आले आहे.

नवरी मिळे नवऱ्याला या सिनेमातील ‘झीर मीर झीर मीर श्रावण धारा, धुंद करी मदनाचा वारा, ये ना सजना ये ना, निशाणा तुला दिसला ना’ या गाण्यांसारखी एका शेकडो गाणी रसिकांच्या ओठांवर आजही त् ााजी आहेत. श्रावणसरींनी प्रेमाचे अवघे विश्व व्यापून टाकलेले
आहे.
सृष्टीची सृजनता, उत्पत्ती, नवोन्मेष मनुष्याच्या आयुष्यातही जसाचा तसा उतरवण्यामध्ये श्रावणाचा मोठा वाटा आहे. मराठीसोबतच हिंदी सिनेमाही याला अपवाद राहिलेला नाही.
रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाये मन भिगे आज इस मौसम मे लागी कैसी ये लगन, सावन का महिना पावन करे सोर, मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा अशा गाण्यांनी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

Web Title: Shravan month romance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.