नवरात्रोत्सवात शेवंती फुलाचे बाजारभाव घसरले
By admin | Published: October 5, 2016 01:40 AM2016-10-05T01:40:14+5:302016-10-05T01:40:14+5:30
दर वर्षीच फूलबाजारात अधिराज्य गाजवणाऱ्या राजा शेवंती फुलांचे बाजारभाव ऐन नवरात्रोत्सवात पाऊस पडत असल्याने पूर्णत
भुलेश्वर : दर वर्षीच फूलबाजारात अधिराज्य गाजवणाऱ्या राजा शेवंती फुलांचे बाजारभाव ऐन नवरात्रोत्सवात पाऊस पडत असल्याने पूर्णत: कोसळल्याने फूलउत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे वार्षिक गणित कोलमडणार आहे.
पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र भुलेश्वर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात राजा शेवंतीचे फड पाहावयास मिळतात. येथील हवामान, हलक्या प्रतीची पोषक जमीन, जेमतेम पाणी या कारणांमुळे येथील राजा शेवंती फुले पुणे, मुंबई, नगर इत्यादी बाजारपेठांत नाव कमावतात. तळहातावरील फोडाप्रमाणे या पिकाला सहा महिने जपावे लागते. श्रीक्षेत्र भुलेश्वर मंदिर परिसरात ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईशी सामना करावा लागतो. या दिवसांत पिण्याच्या पाण्याची तीव्र पाणी टंचाई जाणवते. या फुलांची लागण ऐन उन्हाळ्यात म्हणजेच मार्च व एप्रिल महिनांत केली जाते. यासाठी बेणे (रोप) नगर जिल्ह्यातील पारनेर, आंबवणे, सुपे या भागातील शेतकऱ्यांकडून खरेदी करावे लागते. यासाठी एक एकर राजा शेवंती लागणीसाठी दहा हजार रुपये किमतीचे बेणे (रोप) लागते.