पणत्यांनी उजळले श्रीकाळभैरवनाथ मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 11:50 PM2018-11-10T23:50:23+5:302018-11-10T23:50:41+5:30
खोर : खोर (ता. दौंड) परिसरामध्ये दीपावली पाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीदेखील पारंपरिक प्रथेप्रमाणे खोरचे श्री ...
खोर : खोर (ता. दौंड) परिसरामध्ये दीपावली पाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीदेखील पारंपरिक प्रथेप्रमाणे खोरचे श्री काळभैरवनाथ मंदिर, हनुमान मंदिर व लक्ष्मीमाता मंदिर परिसर दीपावली पाडव्याच्या सणाला हजारो पणत्यांनी उजळून निघाला होता.
मंदिरासमोरील अंगणात तब्बल ८ तास आकर्षक रांगोळी काढण्यात आली. ही रांगोळी प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होती. गावातील प्रत्येक व्यक्ती, वाटसरू या भव्यदिव्य काढलेल्या रांगोळीसोबत आपला सेल्फी काढत होता. मंदिरामध्ये लावलेल्या हजारो पणत्यांच्या लखलखत्या प्रकाशझोताने मंदिर परिसर व रांगोळीने उपस्थितांचे मन आकर्षित होऊन अगदी प्रसन्न होऊन जात
होते. कार्यक्रमाचे आयोजन खोर मित्र ग्रुपच्यावतीने करण्यात आले होते.
याप्रसंगी खोरचे सरपंच सुभाष चौधरी, विजय कुदळे, राजेंद्र डोंबे, राजेंद्र चौधरी, जालिंदर डोंबे, भाऊ डोंबे, भानुदास डोंबे, गणेश साळुंखे, साहेबराव डोंबे, योगेश शिंदे, चेतन गायकवाड, प्रमोद शिंदे, दादा
शिंदे, गणेश फरतडे, सुरेश शेंडगे, दिनकर डोंबे, सुनील डोंबे, तसेच मोठ्या संख्येने महिलावर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.
पेडगावच्या किल्ल्यात दीपोत्सव
देऊळगावराजे : पेडगाव (ता. दौंड) येथील युवकांनी पेडगावच्या किल्ल्यात भव्य दीपोत्सव साजरा केला.
दिवाळी पाडव्यानिमित्त दरवर्षी भव्य दीपोत्सव साजरा करण्यात येतो. छत्रपती श्री संभाजीमहाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पेडगाव किल्ल्यात ३५०० दिवे लावून भव्य दीपोत्सव साजरा केला. फटाक्यांची भव्य गगनचुंबी आतषबाजी करण्यात आली. संभाजीमहाराज स्मारक, लक्ष्मीनारायण मंदिर, बालेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, रामेश्वर मंदिर, भैरवनाथ (विष्णू) मंदिर, पाताळेश्वर मंदिर व टेकडीवरील पायऱ्यांवर पणत्या लावून परिसर प्रकाशमय केला.
आदिवासी गरीब बांधवांना व गडपालांना दिवाळी फराळाचे व मिठाईचे वाटप करण्यात आले. उपक्रम श्री शिवदुर्ग संवर्धन समिती सदस्य प्रा. राजेश बाराते, नीलेश खेडकर, देवेंद्र अवचर व प्रल्हाद जाधव, तसेच गडपाल नंदू क्षीरसागर, भाऊ घोडके व मच्छींद्र पंडित यांनी पार पाडला. पेडगाव, वडगाव दरेकर येथील शिवप्रेमी उपस्थित होते.