श्री महागणपतीला चंदन उटी लेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:05 AM2021-05-03T04:05:53+5:302021-05-03T04:05:53+5:30
दर वर्षी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र रांजणगाव गणपती ट्रस्टच्या वतीने श्री ...
दर वर्षी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून
अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र रांजणगाव गणपती ट्रस्टच्या वतीने श्री महागणपतीला चंदन उटीचा लेप लावला जातो.
ग्रीष्म ऋतूतील वाढती उष्णता लक्षात घेऊन श्रींच्या मूर्तीची दाहकता कमी व्हावी, या उद्देशाने ही मृदू, पवित्र चंदन उटी करण्यात येते.
गणेशभक्त सुरेंद्र वधवा यांच्या वतीने महागणपतीला चंदन उटी लेप, तर उद्योजक अनिल दुंडे व सचिन दुंडे या बंधूंतर्फे १०१ डझन सफरचंदाचा महानैवेद्य देवाला दाखवण्यात आल्याचे विश्वस्त डॉ. संतोष दुंडे यांनी सांगितले. या ववेळी देवस्थान ट्रस्टचे डॉ. संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर, ॲड. विजयराज दरेकर, व्यवस्थापक, बाळासाहेब गोऱ्हे, हिशेबनीस संतोष रणपिसे तसेच पुजारी मकरंद कुलकर्णी व पुजारी प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.
कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्णयानुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंदिर भाविकांना दर्शनासाठी पूर्णपणे बंद असून ‘श्रीं’ची दैनंदिन पूजा, धार्मिक विधी नित्यनियमाने सुरू असल्याचे विश्वस्त प्रा. नारायण पाचुंदकर यांनी सांगितले.
फोटो: श्री महागणपतीला चंदन उटीचा लेप लावून दाखवण्यात आलेला सफरचंदाचा महानैवेद्य.