श्रीराम एका समाजाचे, एका भाषेचे किंवा एका संप्रदायाचे नाहीत- स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 04:56 PM2024-02-04T16:56:14+5:302024-02-04T16:56:54+5:30
तीर्थक्षेत्र आळंदीत आयोजित करण्यात आलेल्या गीताभक्ति अमृत महोत्सवाच्या प्रारंभी पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते....
आळंदी (पुणे) : आपला देश एक असला पाहिजे. तो श्रेष्ठ असला पाहिजे आणि तो समर्थ असला पाहिजे. तो समर्थ असल्याकारिता आपली मनं मिळालेली पाहिजे. भारत मातेचे प्रेम संवर्धन झालं पाहिजे. मदरसांच्या प्रमुखांनी श्रीरामतीर्थाचे धडे आम्हाला मदराशामधनं सुरू केले पाहिजेत असे सांगितले. कारण श्रीराम एका समाजाचे नाहीत, एका भाषेचेही नाही किंवा एका संप्रदायाचे नाहीत असे स्पष्ट मत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष राष्ट्रसंत पूज्य स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज यांनी व्यक्त केले.
तीर्थक्षेत्र आळंदीत आयोजित करण्यात आलेल्या गीताभक्ति अमृत महोत्सवाच्या प्रारंभी पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते. याप्रसंगी संयोजक डॉ. संजय मालपाणी, गिरीधरजी काळे, डॉ. आशु गोयल, शेखर मुंदडा आदी उपस्थित होते.
स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज पुढे म्हणाले, लोकांना वाटतं रामाची प्रतिष्ठा झाली म्हणजे मंदिराचे काम आटोपलं. मात्र असं होत नाही. श्रीराम मंदिराचे काम पूर्ण होण्याकरता किमान अडीच ते तीन वर्षे लागणार आहेत. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम परिवाराची स्थापना केली जाणार आहे. त्यानंतर बाउंड्री वॉलमध्ये सहा मंदिरांची स्थापना करायची आहे. इतिहासाबद्दल बाचाबाची न करत बसता आपला वर्तमान काळ आणि भविष्यकाळ चांगला व्हावा ही महत्त्वाची बाब आहे.