श्रीरामजन्मोत्सव आंबेगाव तालुक्यात साध्या पद्धतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:09 AM2021-04-22T04:09:40+5:302021-04-22T04:09:40+5:30
सलग दोन वर्षे कोरोनामुळे श्रीरामनवमी उत्सव साजरा झाला नाही. शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे बहुतेक श्रीराम मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. ...
सलग दोन वर्षे कोरोनामुळे श्रीरामनवमी उत्सव साजरा झाला नाही. शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे बहुतेक श्रीराम मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. पुजाऱ्यांनी विधिवत पूजा व देवजन्म मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत साजरा केला. आंबेगाव तालुक्यात श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग, मंचर, नांदूर, पिंपळगाव खडकी तसेच तालुक्यातील इतर गावांमध्ये असलेल्या श्रीराम मंदिरांमध्ये केवळ धार्मिक विधी पार पडले. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. भाविकांनी आपल्या घरूनच श्रीरामाचे दर्शन घेतले. अनेक मंदिरांत फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी गावोगावच्या श्रीराम मंदिरांना भेटी देऊन ग्रामस्थांकडून माहिती घेतली. त्यांच्या समवेत पोलीस राजेश नलावडे होते. माजी सरपंच बाळासाहेब शिंदे व बाळासाहेब पिंगळे यांनी या वेळी कोरे यांना माहिती दिली. दरम्यान मंदिर परिसर भाविकांविना सुना सुना झाला होता.
पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी वडगाव काशिंबेग येथील श्रीराम मंदिराला भेट दिली.