मकर संक्रातीला देहूगावातील श्री संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर व वैंकुठगमण राहणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 11:10 AM2022-01-12T11:10:43+5:302022-01-12T11:15:55+5:30
यंदा कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केली आहे
देहूगाव- येथे एकाच दिवसात 9 कोरोनाचे रुग्ण आढळले व पुणे, मुंबईसारख्या शहरात कोरोनाचे वाढते रुग्ण वाढत आहेत. देहूगाव येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिर व विठ्ठल रुक्मिनी मंदिरात मकरसंक्रातीच्या निमित्ताने या दिवशी ओवसा घेऊन देवाला ओवसण्यासाठी येत असतात. मात्र यंदा कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केली आहे. शासनाच्या निर्णयाला प्रतिसाद देत श्री संत तुकाराम महाराज संस्थानने येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर शुक्रवारी (14 जानेवारी) भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हणले आहे.
कोरोना विषाणूंचा संसर्गामुळे रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अनेक प्रतिबंधक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. कोव्हिड 19 या विषाणूंचा ओमायक्रॉंन व्हेरियंटचा संसर्ग व लोकांचा समूह टाळण्यासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू मुख्य मंदिर व वैकुंठगमन स्थान मंदिर शुक्रवार दि 14 जानेवारी 2022 रोजी सकाळी 05.00ते रात्री 8.00 वा पर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
या कालवधीत महिला भगिनींनी व भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये. 15 जानेवारीला नियमित मंदिर दर्शनासाठी उघडे राहणार असून भाविक भक्तांनी संस्थानला सहकार्य करावे असे अवाहन संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे व सर्व विश्वस्थांनी केले आहे.