श्रीक्षेत्र जेजुरीस जिल्हाधिकाऱ्यांची भेट, विकास आराखडाअंतर्गत केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:08 AM2021-07-01T04:08:39+5:302021-07-01T04:08:39+5:30
यानंतर बोलताना त्यांनी पालकमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जेजुरी विकासासाठी निधी उपलब्ध केला आहे. त्यानुसार जेजुरीचा विकास आराखडाही तयार ...
यानंतर बोलताना त्यांनी पालकमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जेजुरी विकासासाठी निधी उपलब्ध केला आहे. त्यानुसार जेजुरीचा विकास आराखडाही तयार केलेला आहे. आराखड्यानुसार जेजुरीत चार टप्प्यात विकास कामे केली जाणार आहेत. म्हणून आराखड्यात असणारी कामे आणि नव्याने समाविष्ट करावी लागणारी कामे याबाबत आपण प्रत्यक्ष भेट दिली आहे. पहाणीनंतर त्यांनी संबंधितांना योग्य त्या सूचना ही दिल्या आहेत.
यावेळी आ. संजय जगताप यांनी विकास आराखड्याच्या माध्यमातून होणाऱ्या विकासकामांची माहिती दिली. त्याचबरोबर कडेपठार मंदिराला ऐतिहासिक गडासारखा लूक यावा, कडेपठार मंदिर ते जेजुरी गड डोंगरावर वृक्षारोपण, सुशोभीकरण, जेजुरी शहरातील व गडाच्या पायऱ्यावरील स्ट्रीट लाईट अंडरग्राऊंड असाव्यात,होळकर आणि पेशवे तलावाच्या परिसरात सुशोभीकरण, शहरातील मंदिरे, धालेवाडी येथील घाट, जलशयावरील भाविकांना अंघोळीसाठी घाट, स्नानगृहे, गडावर जाणारे तिन्ही बाजूचे पायरीमार्ग व वाहनतळ आदी प्राधान्याने विकास आराखड्याच्या माध्यमातून होणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनीही संबंधितांना सूचना दिल्या.
या पाहणी दौऱ्यात निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनोबत, जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळ, सहा. नियोजन अधिकारी किरण इंदलकर ,सार्व. बांधकाम विभाग मुख्य अभियंता अजयकुमार भोसले, पुरातत्त्व विभागाचे सहा. संचालक विलास वहाणे,जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे ,मुख्याधिकारी पूनम शिंदे कदम , देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त प्रसाद शिंदे ,विश्वस्त राजकुमार लोढा ,पंकज निकुडेपाटील ,आदींसह सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी जेजुरी गडास भेट देऊन पाहणी केली.