Bhausaheb Rangari Ganpati| दिमाखदार मिरवणूकीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विसर्जन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 03:04 PM2022-09-10T15:04:15+5:302022-09-10T15:06:30+5:30

भाऊसाहेब रंगारी गणपतीचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन...

shrimant Bhausaheb Rangari Ganapati visarjan miravnuk immersion with a spectacular procession | Bhausaheb Rangari Ganpati| दिमाखदार मिरवणूकीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विसर्जन

Bhausaheb Rangari Ganpati| दिमाखदार मिरवणूकीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विसर्जन

googlenewsNext

पुणेआकर्षक फुलांनी सजलेला पारंपरिक रथ त्यावर उभारलेला पुष्प रणशिंग चौघडा, रथावर होणारी कोल्ड फायरची विद्युत आतषबाजी आणि सोबतीला मर्दाणी खेळांसह ढोल-ताशाचा दणदणाट अशा दिमाखदार आणि तब्बल दहा तास चाललेल्या लक्षवेधक मिरवणूकीने हिंदुस्थानातील मानाचा पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन झाले.

प्रथा-परंपरेनुसार शुक्रवारी सकाळी मंडईतील महात्मा फुले पुतळ्याला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून पुष्पहार घालून या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली. मानाच्या पाच गणपतीलाही ट्रस्ट कडून पुष्पहार अपर्ण करण्यात आला. उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांच्या हस्ते गणपतीची आरती झाल्यानंतर रात्री अकरा वाजता प्रत्यक्ष मिरवणुकीला सुरवात झाली. पारंपरिक रथाला विविध आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. त्यावर चारही बाजूंनी पुष्प रणशिंग चौघडे उभारण्यात आले होते. तर या रथावर कोल्ड फायरच्या माध्यमातून विद्युत आतिषबाजी करण्यात येत होती. त्यामुळे हा रथ गणेश भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा होता.

शुभ्र पांढऱ्या बैल जोडीने सजलेल्या या रथाचे सारथ्य उत्सव प्रमुख पुनीत बालन हे स्वतः करत होते. मिरवणुकीच्या सुरवातीला भाऊसाहेब रंगारी यांचा पुतळा विराजमान असलेला रथ लक्ष वेधून घेत होता. त्यापाठोपाठ शिवयोद्धा मर्दाणी आखाडा यांच्या बाल कलाकारांकडून लाठी-काठी , तलवार बाजी, भाला खेळ अशा विविध साहसी खेळांची प्रात्यक्षिके साजरी केली जात होती. त्यापाठोपाठ समर्थ, नादब्रम्ह आणि श्रीराम या ढोल ताशा पथकाचे वादन केले जात होते.

लक्ष्मी रस्त्यावर ही विसर्जन मिरवणूक आल्यानंतर विविध ठिकाणी परंपरेनुसार  भाऊसाहेब रंगारीला पुष्पहार अपर्ण करून संबधित मानाच्या व्यक्तीच्या हस्ते आरती केली जात होती. मिरवणूक मार्गावर ठीकठिकानी नागरिकाकडून पुष्पवृष्टीही केली जात होती. त्यात रथावर होणारी विद्युत रोषणाई यामुळे हा रथ भाविकांचे लक्ष वेधून घेत होता. 

पोलीस आयुक्तांच्या हस्ते आरती
सकाळी नऊ वाजता टिळक चौकात (अलका) श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाच्या रथाचे आगमन झाले. याठिकाणी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता व महापालिका अतिरिक्त आयुक्त विलास कानडे यांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती झाली. यावेळी या चौकात भाविकांची प्रचंड गर्दी आली. गणपती बाप्पा मोरया- मंगलमूर्ती मोरया या जय घोषाने संपूर्ण चौक दणाणून गेला होता. त्यानंतर ही विसर्जन मिरवणूक मार्गस्थ झाली.

Web Title: shrimant Bhausaheb Rangari Ganapati visarjan miravnuk immersion with a spectacular procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.