ओझर येथे भक्तिमय वातावरणात श्रींची दुसरी पालखी द्वारयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:13 AM2021-09-09T04:13:54+5:302021-09-09T04:13:54+5:30
पुजारी वृंद हेरंब जोशी व इतरांनी पहाटे पाचला श्रीची महापूजा करून सातला श्रींची महाआरती करण्यात आली. सकाळी साडेनऊच्या ...
पुजारी वृंद हेरंब जोशी व इतरांनी पहाटे पाचला श्रीची महापूजा करून सातला श्रींची महाआरती करण्यात आली. सकाळी साडेनऊच्या दरम्यान मोरया गोसावी यांच्या पदांचे गायन करत टाळ मृदंगाच्या गजरात ट्रस्टच्या वाहनामधून अध्यक्ष, विश्वस्त व कर्मचारी वृंद यांच्या समवेत दुसरा दक्षिणद्वार धनेगाव या ठिकाणी करून उमा–महेश पूजा करून संपन्न झाला.
श्रींच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आसराई मातेला आपल्या जन्माचे आमंत्रण देण्यात आले. गणेश जन्मोत्सवानिमित्त मंदिरात रांगोळी, परिसर स्वच्छता,श्रींच्या मूर्तीला आकर्षक फुलांची सजावट मंदिराला विद्युत रोणणाई करण्यात आली होती. सर्व ग्रामस्थ, भाविकाना देवस्थानच्या वतीने कोरोना महामारीत गर्दी करू नका व सोशल डिस्टस्टिंगचे पालन करा, सॅनिटायझर, मास्कजवळ बाळगा, असे आवाहन करण्यात आले होते. त्याचे काटेकोरपणे पालन ग्रामस्थ व भाविक यांनी केलेले पाहायला मिळाले. द्वारयात्रा सोहळ्याचे इंटरनेटद्वारे मोबाइलमध्ये थेट प्रेक्षपण पाहता येण्याची सुविधा देवस्थान ट्रस्टने केली होती.
भक्तिमय वातावरणात निघालेली श्रींची दुसरी पालखी द्वारयात्रा