खेड-शिवापूर टाेल नाका तात्काळ बंद करा ; संभाजी ब्रिगेडची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 01:32 PM2019-05-22T13:32:01+5:302019-05-22T13:41:18+5:30
खेड- शिवापूर टाेल नाका तात्काळ बंद करण्यात यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यातत आली आहे.
पुणे : पुणे - सातारा रस्त्यावरील खेड- शिवापुर टाेल नाक्यावर नागरिकांची आर्थिक लुट हाेत असून टाेल प्रशासनाच्या गलथान कारभरामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे हा टाेल तात्काळ बंद करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. त्याचबराेबर पुणे जिल्ह्यातील साेलापूर रस्ता, सातारा रस्ता या मार्गावरील सर्व टाेलची कालमर्यादा तपासून बंद करावेत अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदाेलन करण्यात येईल असा इशाराही ब्रिगेडकडून देण्यात आला आहे.
पुणे- सातारा रस्त्यावरील खेड- शिवापूर नागरिकांची प्रचंड आर्थिक लुट हाेत आहे. टाेलची काल मर्यादा पाहता खेड- शिवापूर टाेल हा जुना आहे. टाेलची कालमर्यादा संपुन बरेच दिवस झालेले असतानाही टाेल वसूली व टाेलधारी गुंड पाेसण्याचे काम प्रशासनाकडून सुरु आहे. टाेल प्रशासन येथील वाहतूक काेंडी कमी करण्यासाठी काेणत्याही उपाययाेजना करताना दिसत नाही. शनिवार- रविवार या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसाेय हाेत आहे.
खेड- शिवापूर रस्त्याची नवीन निर्मिती, देखभाल व दुरुस्ती तसेच टेंडरचा कार्यकाल पाहता विनाकारण जनतेकडून काेट्यावधी रुपयांची वसूली केली जात आहे. जुन्या व खाेट्या पावत्या दिल्या जातात. पुणे जिल्ह्यातील टाेलवर कुणाचेही बंधन राहिलेले नाही. काेणत्याही टाेलचे ऑडिट केले जात नाही. याउलट टाेलनाक्यावर गुंड पाेसले जातात. त्यामुळे हे टाेलनाके बंद करावेत अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.
तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व टाेलनाक्यांची काल मर्यादा तपासून ते बंद करण्यात यावेत. अन्यथा तीव्र आंदाेलन करण्यात येईल असा इशारा ब्रिगेड कडून देण्यात आला आहे.