रिंगरोड विरोधी कृती समितीच्या अध्यक्षपदी श्यामसुंदर जायगुडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:13 AM2021-08-21T04:13:44+5:302021-08-21T04:13:44+5:30
भोर तालुक्यातील रिंगरोड जाणाऱ्या गावांमधील नागरिकांनी रिंगरोडला विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय रिंगरोड विरोधी कृती समिती स्थापन केली आहे. पुण्याच्या पश्चिम ...
भोर तालुक्यातील रिंगरोड जाणाऱ्या गावांमधील नागरिकांनी रिंगरोडला विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय रिंगरोड विरोधी कृती समिती स्थापन केली आहे. पुण्याच्या पश्चिम रिंगरोड विभागात भोर तालुक्यातील कांबरे, नायगाव, केळवडे, कांजळे, खोपी, कुसगाव, रांजे व या भोर तालुक्यास लागून असलेल्या हवेली तालुक्यातील कल्याण, रहाटवडे ही गावे बाधित होत आहे. या भागातील बागायती क्षेत्रामधून रिंगरोड जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आतापर्यंत येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विरोध केला असून, हरकती दिल्या आहेत. तसेच, मोजणीला विरोध केला आहे. परंतु, प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करून मोजण्या चालू ठेवल्या आहेत. शेतकऱ्यांच्या या विरोधाला राजकीय पक्षांची साथ लाभावी व शासन पातळीवर हा विषयाची दखल घेतली जावी, यासाठी बाधित शेतकऱ्यांनी सर्वच राजकीय पक्षांना याबाबत लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. त्याकरीता तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी सहकार्याची भूमिका घेतली असून, सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मिळून रिंगरोड विरोधी कृती समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी श्यामसुंदर जायगुडे, उपाध्यक्षपदी प्रमोद मोहिते, सचिवपदी योगेश मांगले, संयोजकपदी महेश कोंडे, कार्याध्यक्षपदी पोपट चोरघे यांची निवड केली असून, सदस्यपदी बाधित शेतकरी व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची निवड केली आहे.
२० नसरापूर जायगुडे
190821\3610img-20210812-wa0014__01.jpg
सोबत फोटो : केळवडे येथील प्रगतशील शेतकरी श्यामसुंदर जायगुडे यांची रिंगरोड विरोधी कृती समितीच्या अध्यक्षपदी निवड.