चायना, पाकिस्तानवर लक्ष ठेवण्यासाठी सियाचीन हातात असणे आवश्यक-

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:12 AM2021-02-24T04:12:50+5:302021-02-24T04:12:50+5:30

निवृत्त ब्रिगेडियर प्रसाद जोशी : अखिल मंडई मंडळाच्या वतीने मराठा लाईट इन्फन्ट्रीचे हवालदार प्रशांत मुळे यांचा सन्मान पुणे : ...

Siachen must be in hand to keep an eye on China, Pakistan- | चायना, पाकिस्तानवर लक्ष ठेवण्यासाठी सियाचीन हातात असणे आवश्यक-

चायना, पाकिस्तानवर लक्ष ठेवण्यासाठी सियाचीन हातात असणे आवश्यक-

Next

निवृत्त ब्रिगेडियर प्रसाद जोशी : अखिल मंडई मंडळाच्या वतीने मराठा लाईट इन्फन्ट्रीचे हवालदार प्रशांत मुळे यांचा सन्मान

पुणे : सियाचीन हा अतिशय दुर्गम आणि कठीण भाग असला तरी तो भारतासाठी अत्यंत आवश्यक आहे. पाच मोठ्या देशांच्या सीमा या ठिकाणी मिळतात. चीन, पाकिस्तान, अफगाणिस्तान यांच्या हालचालींवर लक्ष ठेवायचे असेल तर सियाचीन भारताच्या हातात असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन निवृत्त ब्रिगेडियर प्रसाद जोशी यांनी केले.

सियाचीन भागात पराक्रम गाजवताना जायबंदी झालेले मराठा लाईट इन्फंट्रीचे हवालदार प्रशांत मुळे यांचा सन्मान अखिल मंडई मंडळाच्या वतीने करण्यात आला. निवृत्त हवालदार मेजर बजरंग निंबाळकर आणि हवालदार संदीप मोरे यांचा देखील सन्मान करण्यात आला. अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, खजिनदार संजय मते, विश्वास भोर, देविदास बहिरट, राजेश कारळे, आनंद सराफ, सूरज थोरात, अनिकेत तापकीर, अजय झवेरी, आनंद इनामदार, हरीश मोरे, अमोल पडळकर, ओमकार थोरात, आशिष थोरात या वेळी उपस्थित होते.

प्रसाद जोशी म्हणाले, ‘सियाचीन हा भारताचा अतिशय मौल्यवान आणि महत्त्वाचा भाग आहे. आज अनेकांना सियाचीन हा देशाच्या नकाशावर नेमका कुठे आहे, हे माहीत नाही. सियाचीनमध्ये केवळ बर्फ असतो. १ किलोमीटर अंतर चालायला ५ तास लागतात. एकटा माणूस कुठेही जाऊ शकत नाही. अतिशय कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितीत आपले जवान तिथे राहत असतात. यावरून सियाचीनचे महत्त्व आपल्या लक्षात येते.’ आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Siachen must be in hand to keep an eye on China, Pakistan-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.