Video: 'परवानगी घेऊनच महिलांच्या त्या फोटोचा वापर..', फोटो वादावरून सिद्धार्थ शिरोळेंचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 03:16 PM2024-07-30T15:16:41+5:302024-07-30T15:19:38+5:30

सिद्धार्थ शिरोळे यांनी छापलेल्या फ्लेक्सवर परवानगी न घेता २ फोटो छापल्याचे म्हणत महिलांनी पुणे पोलिसात धाव घेतली होती

Siddharth Shirole explanation on the photo controversy Using that photo of women ladki bahin yojana only with permission | Video: 'परवानगी घेऊनच महिलांच्या त्या फोटोचा वापर..', फोटो वादावरून सिद्धार्थ शिरोळेंचे स्पष्टीकरण

Video: 'परवानगी घेऊनच महिलांच्या त्या फोटोचा वापर..', फोटो वादावरून सिद्धार्थ शिरोळेंचे स्पष्टीकरण

किरण शिंदे

पुणे: भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पुणेपोलिसात तक्रार देण्यात आली. राज्य सरकारच्या लाडकी बहीण जाहिरातीत वापरलेल्या फोटो वरून हा वाद निर्माण झाला होता. सिद्धार्थ शिरोळे यांनी छापलेल्या फ्लेक्सवर दोन महिलांचे फोटो छापण्यात आले आहेत. आपली परवानगी न घेता हे फोटो छापल्याचे म्हणत या महिलांनी पुणे पोलिसात धाव घेतली होती. पुण्याचे सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्याकडे त्यांनी तक्रार अर्ज दिला होता. यावर आता सिद्धार्थ शिरोळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ज्या फोटोग्राफरने हे फोटो काढले होते त्याची परवानगी घेऊनच हे फोटो वापरले असल्याचे त्यांनी सांगितले. 

सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रसार व्हावा आणि महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळावेत या हेतूने ते फ्लेक्स लावण्यात आले होते. या फ्लेक्सवर ज्या महिलांचे फोटो वापरण्यात आले होते त्याची आधीच परवानगी घेतली होती. जाहिरात एजन्सीच्या माध्यमातून, परवानगी घेऊन आणि रीतसर पैसे भरूनच त्या फोटोचा वापर करण्यात आला होता. २०१६ साली हा फोटो काढण्यात आला होता. ज्या छायाचित्रकाराने हा फोटो काढला त्याची परवानगी घेऊनच जाहिरात एजन्सीच्या मार्फत हा फोटो वापरण्यात आला आहे. जाहिरातीत हा फोटो वापरण्यामागे ही जाहिरात लोकांपर्यंत पोहोचवणे हाच उद्देश आहे. तरीसुद्धा हा फोटो वापरल्याने त्या महिलांना वेदना झाली असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.

दरम्यान सिद्धार्थ शिरोळे यांच्या नावाने प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत ज्या महिलांचे फोटो वापरण्यात आले होते त्यांनी पोलिस हा तक्रार दिली आहे. आपल्याला न विचारता फोटो वापरल्यामुळे कुटुंबात वाद-विवाद आणि गैरसमज निर्माण झाल्याचं त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटल होते. सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे त्यांनी हा तक्रार दिला होता.

Web Title: Siddharth Shirole explanation on the photo controversy Using that photo of women ladki bahin yojana only with permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.