सिद्धेश्वर गणेशोत्सव मंडळाची आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत

By admin | Published: September 26, 2015 02:35 AM2015-09-26T02:35:47+5:302015-09-26T02:35:47+5:30

नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने विषाचा घोट घेतल्यानंतर उघड्यावर पडलेल्या या कुटुंबासाठी उमरखेड येथील सिद्धेश्वर गणेश मंडळ धावून गेले आहे.

Siddheshwar Ganeshotsav Mandal's help for suicide victims | सिद्धेश्वर गणेशोत्सव मंडळाची आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत

सिद्धेश्वर गणेशोत्सव मंडळाची आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत

Next

राजगुरुनगर : वीजबिलाच्या संदर्भाबाबत नागरिकांच्या विविध अडी-अडचणी सोडविण्यासाठी तसेच वीजबिल आकारणी दोन महिन्यांनी करण्यासाठी खेड तालुका ग्राहक हक्क समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
पूर्वी वीज वितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना वीजबिल प्रत्येक तीन महिन्यांनी देण्यात येत होते. त्यानंतर ते दोन महिन्यांनी देण्यास सुरुवात झाली. तर सध्या प्रत्येक महिन्यास वीजबिल देण्यात येते. परंतु या वीजबिल वितरण कार्यपद्धतीत दिरंगाई होत असून, वीजबिल भरण्याच्या शेवटच्या एक दिवस अगोदर ग्राहकांच्या हातात वीजबिल देण्यात येते अथवा वीजबिल भरण्याची शेवटची तारीख
उलटून गेली तरी वीजबिल ग्राहकांना मिळत नाही. त्यामुळे वीजग्राहकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
राजगुरुनगर परिसरातील वीजमीटरचे रीडिंग घेण्यासाठी वीजवितरण कंपनीकडून नेमण्यात आलेल्या एजन्सीकडून प्रत्येक महिन्यास वीजमीटरचे रीडिंग वेळेवर घेतले जात नाही. त्यामुळे कित्येक वेळा वीज ग्राहकांना अंदाजे वीजबिल दिले जाते. त्यामुळे वीज ग्राहकांचे महिन्याचे आर्थिक नियोजन कोलमडते.
वीजबिल वितरण व्यवस्था सक्षम नसल्यामुळे अनेकदा मुदत संपल्यानंतर वीजबिल वाटप केले जाते. (वार्ताहर)

Web Title: Siddheshwar Ganeshotsav Mandal's help for suicide victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.