पुणे जिल्ह्यात १२ फुटी अजगराचे दर्शन; सर्पमित्रांनी सोडले सुरक्षितपणे पुन्हा जंगलात 

By श्रीकिशन बलभीम काळे | Published: November 19, 2022 01:55 PM2022-11-19T13:55:13+5:302022-11-19T13:59:47+5:30

भारतातील अजगराला राॅक पायथाॅन म्हटले जाते...

Sighting of 12-foot python in Pune district; The snake friends left safely back in the forest | पुणे जिल्ह्यात १२ फुटी अजगराचे दर्शन; सर्पमित्रांनी सोडले सुरक्षितपणे पुन्हा जंगलात 

पुणे जिल्ह्यात १२ फुटी अजगराचे दर्शन; सर्पमित्रांनी सोडले सुरक्षितपणे पुन्हा जंगलात 

Next

पुणे : सिंहगड परिसरात घनदाट जंगल असून, कुडजे गावात एक १२ फूट लांबीचे अजगर आढळून आले. त्यामुळे परिसरातील जैवविविधता चांगली असल्याचे यावरून स्पष्ट होते. या अजगाराला वन्यजीव रक्षकांनी गावापासून दूर जंगलात वन विभागाच्या मदतीने सोडून दिले‌. सर्पमित्र स्वप्निल काकडे, आकाश झोंबाडे, पृथ्वीराज काळे, साहिल केंद्रे, विष्णू कोंडरवाड यांनी अजगराला जंगलात सोडले. वन्यजीव संरक्षक तानाजी भोसले यांनी यासाठी पुढाकार घेतला. वन्यजीवांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे भोसले म्हणाले. 

अजगर हा सर्वात मोठा बिनविषारी साप आहे. भारतातील अजगराला राॅक पायथाॅन म्हटले जाते. घनदाट जंगल, झाडांवर, खडकाळ जमिनीवर याचा वावर आहे. भारतात सर्वात मोठ्या अजगराची लांबी १० मीटरपर्यंत तर घेर २५ सेंटीमीटर आहे. त्याच्या त्वचेवर गुळगुळीत आणि चमकदार खवले असतात. पाठीवर फिकट मातकट रंगाच्या पार्श्वभूमीवर गडद तपकिरी रंगाचे ठिपके, पट्टे आणि वेडेवाकडे ठिपके असतात. पोटाच्या बाजूला खवल्यांचे रुंद पट्टे असतात. डोळे पिवळे असून बाहुल्या आडव्या असतात. अजगराच्या वरच्या ओठावरील खाचांना उष्णतेची संवेदनशीलता जास्त असते. त्यामुळे या खाचांद्वारे अजगराला रात्रीच्या अंधारात गारवा असताना उष्ण रक्ताच्या भक्ष्याची जाणीव होते.

अजगर भक्ष्य कसा पकडतो?

हा सर्प बोजड असला तरी भक्ष्य पकडताना कमालीची चपळाई दाखवतो. प्रथम तो भक्ष्यावर झडप मारून त्यास पकडतो. त्यानंतर त्याभोवती शरीराची वेटोळी गुंडाळून आवळत राहतो. भक्ष्याला हालचालच नव्हे, तर श्वासोच्छ्वासही करता येऊ नये अशा रीतीने जखडून भक्ष्याला गुदमरून मारतो. त्यानंतर त्याला डोक्याच्या बाजूने गिळण्यास सुरुवात करतो. यामुळे अशा प्रकारे गिळताना भक्ष्याची शिंगे, पाय यांचा अडसर होत नाही. इतर सर्पांप्रमाणे अजगराच्या जबड्यांची हाडे लवचिक अस्थिबंधांनी जोडलेली असतात. या वैशिष्ट्यामुळे त्याला त्याच्या शरीराच्या घेरापेक्षा मोठ्या आकाराचे भक्ष्य गिळता येते.

सहा महिन्यांपर्यंत पुन्हा शिकार करत नाही-

अजगराच्या दोन्ही जबड्यांवर मागे वळलेले अणकुचीदार दात असतात. जबड्याचा एकदा डावा भाग तर एकदा उजवा भाग आळीपाळीने पुढे सरकवत अजगर भक्ष्य गिळंकृत करतो. त्याच्या पोटात भक्ष्याची हाडेसुद्धा पचविली जातात. परिणामी अजगराच्या विष्ठेमध्ये फक्त केस, शिंगे किंवा पक्ष्यांची पिसे न पचलेल्या स्थितीत आढळतात. एकदा हरिणासारखे भक्ष्य खाल्ल्यानंतर अजगराला सहा महिन्यांपर्यंत पुन्हा शिकार करण्याची गरज भासत नाही.

Web Title: Sighting of 12-foot python in Pune district; The snake friends left safely back in the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.