धायरीमध्ये सिग्नल यंत्रणा फक्त नावालाच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:19 AM2021-02-28T04:19:45+5:302021-02-28T04:19:45+5:30
तसेच डीएसके विश्वकडे जाणाऱ्या रस्त्यावरील उंबऱ्या गणपती चौकातील सिग्नलदेखील बंद आहे. त्यामुळे या भागातही वाहतूक व्यवस्था कोलमडलेली असते. तरी ...
तसेच डीएसके विश्वकडे जाणाऱ्या रस्त्यावरील उंबऱ्या गणपती चौकातील सिग्नलदेखील बंद आहे. त्यामुळे या भागातही वाहतूक व्यवस्था कोलमडलेली असते. तरी या भागातील दोन्ही सिग्नल तत्काळ सुरू करावेत आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी नेमावेत, अशी मागणी धायरी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
या दोन्ही चौकात सकाळी आणि सायंकाळी सातत्याने वाहतूककोंडी होत असून वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागलेल्या असतात. त्याचबरोबर या ठिकाणी वाहतूक शाखेचे कोणतेही कर्मचारी नियुक्त केलेले नाहीत. त्यामुळे वाहनचालक वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत. या बंद असलेल्या सिग्नलमुळे अनेकदा अपघातदेखील झाले असून वाहतूक शाखेने तत्काळ या ठिकाणी वाहतूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून दोन्ही सिग्नल सुरू करावेत, अशी मागणी धायरी ग्रामस्थांनी केली आहे.
------------------------
कोट:
गर्दीच्या वेळेस वाहतूक नियमन करण्यासाठी वाहतूक पोलीस कर्मचारी चौकात असणे गरजचे आहे. त्याचबरोबर येथील सिग्नल यंत्रणा चालू केल्यास वाहतूककोंडी कमी होईल. - आशा सुनील बेनकर, माजी सरपंच, धायरी
सकाळी व संध्याकाळी येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेऊन सिग्नल यंत्रणा चालू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. - नंदकिशोर शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रस्ता वाहतूक विभाग
फोटो ओळ: धायरी येथील बंद अवस्थेत असणारी सिग्नल यंत्रणा.