पीएमपीएमएल बस पास दरवाढी विरोधात स्वाक्षरी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 01:45 PM2017-10-26T13:45:34+5:302017-10-26T13:52:27+5:30

पीएमपीकडून बस पास मध्ये अनावश्यक बेकायदा दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ रद्द करावी, यासाठी विविध संघटनांमार्फत स्वाक्षरी मोहिम राबविण्यात येणार आहे.

Signature campaign against PMPML bus pass | पीएमपीएमएल बस पास दरवाढी विरोधात स्वाक्षरी मोहीम

पीएमपीएमएल बस पास दरवाढी विरोधात स्वाक्षरी मोहीम

Next
ठळक मुद्देबस पास दरवाढ विरोधी स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात शनिवार २८ आॅक्टोबर २०१७ रोजी होणार कोणतीही मंजूर न घेता पीएमपीने परस्पर दरवाढ केली आहे़ : सतीश चितळे

पुणे : पीएमपीकडून ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व इतर बस पास मध्ये अनावश्यक बेकायदा दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ रद्द करावी, यासाठी विविध संघटनांमार्फत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. बस पास दरवाढ विरोधी स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात शनिवार २८ आॅक्टोबर २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता म्हात्रे पूलाजवळील इंद्रधनुष्य सभागृह येथे होणार आहे. पीएमपी प्रवासी मंच, पुणे व पिंपरी चिंचवड येथील ११ स्वयंसेवी संस्था, संघटना मोहिमेत सहभागी होणार आहेत. 
पीएमपीएमएलने १ सप्टेंबर २०१७ पासून प्रवाशांवर संपूर्णपणे अन्याय, जाचक व बेकायदेशीर बस पास दरवाढ लादली आहे. त्यामुळे महागाईने होरपळलेल्या लाखो ज्येष्ठ नागरिक, चाकरमाने, विद्यार्थी, कष्टकरी, मोलकरणी, नर्सेस, फेरीवाले व इतर सामान्य नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. या दरवाढीला विरोध करण्यासाठी ही स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली आहे. 
पीएमपीने सर्व प्रकारच्या पासदरात वाढ केली आहे़ पूर्वी ज्येष्ठ नागरिकांसाठी ४० रुपयांचा पास होता, तो आता ७०० रुपये केला आहे़ विद्यार्थी पास ४०० रुपयांवरुन ६०० रुपये आणि सामान्यांसाठीचा पास १२०० रुपयांवरुन १४०० रुपये केला आहे़ याशिवाय दैनिक पास ५० रुपये होता तसेच ठराविक मार्गासाठी पास दिला जायचा़ नोकरदार तसेच एकाच मार्गावर प्रवास करणार्‍यांसाठी तो फायदेशीर ठरत असे़ तोही पास पीएमपीने बंद केला आहे़ ठराविक मार्गावरील पास घेणार्‍यांनी त्याबाबत चौकशी केली तर त्यांना १४०० रुपयांचा पास घेण्यास सांगितले जाते़ पूर्वी ज्या मार्गासाठी ६०० ते ७०० रुपये खर्च येत असे़ त्यासाठी जवळपास दुप्पट खर्च करायला लागत असल्याने असंख्य नोकरदार आणि कामगारांनी हे पास घेणे बंद केले आहे़ 
याबाबत सतीश चितळे यांनी सांगितले की, पीएमपीला दरवाढ करायची असेल तर, त्यांना रिजनल टॉन्सपोर्ट अ‍ॅथोरिटी (आरटीए) आणि प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांना प्रस्ताव सादर करुन त्यांच्याकडून मंजूरी घ्यावी लागते़ अशी कोणतीही मंजूर न घेता पीएमपीने परस्पर दरवाढ केली आहे़ या दरवाढीने पास घेणार्‍यांची संख्या कमी झाली असून उलट पीएमपीच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला आहे़ 
या स्वाक्षरी मोहिमेत लोकायत पुणे, परिसर पुणे, जनवादी महिला संघटना,शहीद भगतसिंग युवा मंच, पिंपरी-चिंचवड, पिंपरी-चिंचवड सिटीझन्स फोरम,जाणीव संघटना, पुणे, आम आदमी पार्टी, पुणे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुणे, चेतना नागरिक  मंच,पीएमपी प्रवासी मंच, सजग नागरिक मंच आदी संघटना मोहिमेत सहभागी होणार आहेत.  प्रवासी मेळावा सर्वांसाठी खुला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन करण्यात आले आहे. मेळाव्याला मेजर जनरल सुधीर जटार (निवृत्त), चेतन तुपे, किरण मोघे, मारुती भापकर, सुजीत पटवर्धन, संजय शंके, कर्नल बाबूराव चौधरी, रोहन निघोजकर, राजेश चौधरी, ऋषिकेश येवलेकर, धनंजय शेडबाळे, मंचाचे अध्यक्ष जुगल राठी, विवेक वेलणकर, संजय शितोळे, सतीश चितळे, यतीश देवडिगा हे उपस्थित राहणार आहेत. 

Web Title: Signature campaign against PMPML bus pass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे