स्वत:च्या जाळ्यावर स्वाक्षरी करणारा ‘सिग्नेचर स्पायडर’ - भक्ष्याला चकवून ओढतो जाळ्यात; आकारापेक्षा दुप्पट कीटकांना खातो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:12 AM2021-01-20T04:12:03+5:302021-01-20T04:12:03+5:30

आपल्या जाळ्यावर स्वाक्षरी करणारा कोळी म्हणून याला ‘सिग्नेचर स्पायडर’ म्हटले जाते. आपल्या आकारापेक्षा दुप्पट आकाराच्या कीटकांना हा कोळी ...

The 'signature spider' that signs its own web - lures the prey into the net; Eats twice the size of insects | स्वत:च्या जाळ्यावर स्वाक्षरी करणारा ‘सिग्नेचर स्पायडर’ - भक्ष्याला चकवून ओढतो जाळ्यात; आकारापेक्षा दुप्पट कीटकांना खातो

स्वत:च्या जाळ्यावर स्वाक्षरी करणारा ‘सिग्नेचर स्पायडर’ - भक्ष्याला चकवून ओढतो जाळ्यात; आकारापेक्षा दुप्पट कीटकांना खातो

googlenewsNext

आपल्या जाळ्यावर स्वाक्षरी करणारा कोळी म्हणून याला ‘सिग्नेचर स्पायडर’ म्हटले जाते. आपल्या आकारापेक्षा दुप्पट आकाराच्या कीटकांना हा कोळी खाऊ शकतो. सूर्यप्रकाश फुलांवर पडल्यावर रिफ्लेक्शन येते, अगदी तसेच यांना देखील आपल्या रंगगुणांमुळे करता येते. हा आभास ते कीटकांना आकर्षित करण्यासाठी करतात. या कोळ्याच्या आकर्षक रंगांकडे कीटक जातात आणि आपला जीव गमवतात.

मादी कोळी ही नरापेक्षा आकाराने मोठी असते. दोघांमध्ये मिलन झाल्यावर मादी त्या नराला मारून टाकते आणि त्यातील अंडी आपल्या गर्भाशयात घेऊन तिचे संगोपन करते. गर्भाशय म्हणजे एक पिशवी असते. नर आपल्या पिशवीत शुक्राणू ठेवतो. ते मिलन झाल्यावर मादीमध्ये सोडतो. त्यानंतर तो पळून जातो. जर का तो मादीच्या तावडीत सापडला, तर मादी त्याला मारून टाकते.

----------------

कीटक नव्हे प्राणी वर्गातील हा कोळी

इंग्रजी x आकाराचे डिझाइन हा कोळी तयार करतो. तसेच झिगझॅग आकारही तो बनवतो. जमिनीवरील कीटक खाता यावे, यासाठी तो जमिनीपासून खूप जवळ आपलं जाळं विणतो. हा कोळी कीटकांमधील प्राणी वर्गात मोडतो. सहा पाय असतील, तर त्याला कीटक म्हटले जाते. पण याला आठ पाय असल्याने हा कीटक वर्गातील प्राणी आहे.

---------------

उष्ण व मध्य तापमानाच्या प्रदेशात हा आढळतो. हवेत अधिक बाष्प असेल, तर त्या परिसरात दिसतो. शहरात पाण्याच्या टाकीत, वेलीच्या लगत आढळतो. मादी नेहमी सावलीत जाळं विणते. जमिनीकडे तोंड करून ते जाळं विणतात, कारण किटक जमिनीवरून जात असेल, तर त्याला ओढून घेतात. मादीने जाळं बनवल्यानंतर नर तिच्याभोवती आपलं जाळं बनवतो. मादी मिलना झाल्यानंतर नराला मारून टाकते. तसेच मादीने पिल्लं दिल्यावर ते जगण्यासाठी एकमेकांना खातात. त्यानंतर मोठं होऊन घर सोडतात.

- आरती म्हसकर, कीटक अभ्यासक

------------

Web Title: The 'signature spider' that signs its own web - lures the prey into the net; Eats twice the size of insects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.