उजनी धरण पाण्याच्या पातळीत लक्षणीय घट; शेतकऱ्यांना पाणी जपून वापरावे लागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 14:03 IST2025-04-18T14:02:46+5:302025-04-18T14:03:27+5:30
उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील पाणी शेतीसाठी वापरण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार

उजनी धरण पाण्याच्या पातळीत लक्षणीय घट; शेतकऱ्यांना पाणी जपून वापरावे लागणार
भिगवण : पुणे, सोलापूर अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी वरदान असलेल्या यशवंत सागर जलाशय (उजनी धरण) ची पाणी पातळी शुक्रवारी (दि,१८) सकाळी उपयुक्त साठ्यातून मृत साठ्यात गेली. गतवर्षीच्या तुलनेत दोन महिने उशिरा मृत साठ्यात गेला. यामुळे उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी वर्गासह पाणी योजनांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.
सोलारपूर जिल्हयातील शेतीसाठी उन्हाळी आवर्तन तसेच शहरासाठी भीमा नदीतून कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार सलग सोडण्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने घट झाली. यामुळे उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील पाणी शेतीसाठी वापरण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली. दिवसेंदिवस विद्युत पंप पाण्यासोबत पुढे सरकावे लागत आहेत.
धरणातील पाणी पातळी मृत साठ्यात गेल्याने सीना माढा उपसा सिंचन योजना बंद झाली आहे. पुढील दोन दिवसांत दहिगाव उपसा सिंचन योजना देखील बंद होईल. कालवा सल्लागार समितीमध्ये ठरल्याप्रमाणे १५ मे पर्यंत उजनीच्या कालव्यातून शेतीसाठी पाणी चालू राहणार आहे.
उजनी धरण पाणीसाठा शुक्रवारी (दि,१८) सकाळी ८ वा
एकूण पाणीसाठा : १८०४. ७९%
उपयुक्त पाणीसाठा : १. ९८%
आजचा उपयुक्त साठा : ०. १३%