Pune Corona News: पुणेकरांना दिलासा; शहरात गुरुवारी केवळ एकच रुग्ण व्हेंटिलेटवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 09:41 PM2022-03-10T21:41:46+5:302022-03-10T21:42:38+5:30

शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ७६५ इतकीच आहे

Significant reduction in patient numbers Only one patient on ventilator in the city Thursday | Pune Corona News: पुणेकरांना दिलासा; शहरात गुरुवारी केवळ एकच रुग्ण व्हेंटिलेटवर

Pune Corona News: पुणेकरांना दिलासा; शहरात गुरुवारी केवळ एकच रुग्ण व्हेंटिलेटवर

Next

पुणे : गेल्या आठवड्यात दोन आकडी कोरोना रुग्णसंख्या दिसून आली. गेल्या तीन दिवसांपासून रुग्णसंख्येमध्ये पुन्हा काहीशी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. गुरुवारी शहरात २ हजार २४५ चाचण्या झाल्या. त्यापैैकी ११६ रुग्णांमध्ये कोरोनाचे निदान झाले, तर ७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. गुरुवारी शहरात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नाही. सध्या कोरोनाबाधितांपैैकी केवळ एक रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहे.

कोरोनाबाधितांपैैकी ९ रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत असून, इतर रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ७६५ इतकीच आहे. सध्या शहरात ५१३ व्हेंटिलेटर बेड, ४१३८ ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. शहरात आजवर ४५ लाख १३ हजार ३८९ रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैैकी ६ लाख ६१ हजार ४३९ रुग्णांमध्ये कोरोनाचे निदान झाले. त्यापैैकी ६ लाख ५१ हजार ३२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजवर मृत्यू झालेल्या कोरोनाबाधितांची संख्या ९३४८ इतकी आहे.

Web Title: Significant reduction in patient numbers Only one patient on ventilator in the city Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.