हल्ल्याच्या निषेधार्थ नारायणगाव शहरातून मूक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:08 AM2021-01-09T04:08:50+5:302021-01-09T04:08:50+5:30
नारायणगाव शहरात प्रथमच अशा प्रकाराचा भरदिवसा हल्ला करण्यात आल्याने सरपंच योगेश ऊर्फ बाबू पाटे यांच्या नेतृत्वाखाली नारायणगाव शहरातून मूक ...
नारायणगाव शहरात प्रथमच अशा प्रकाराचा भरदिवसा हल्ला करण्यात आल्याने सरपंच योगेश ऊर्फ बाबू पाटे यांच्या नेतृत्वाखाली नारायणगाव शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला, असा प्रकार पुन्हा होऊ नये आणि असा प्रकार घडला तर सर्व ग्रामस्थ एकत्र येतात, हा संदेश सर्वांना मिळावा यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, विघ्नहरचे संचालक संतोष नाना खैरे, सरपंच पाटे यांनी सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांच्याशी चर्चा केली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी या हल्ल्यातील मुख्य सूत्रधार चंद्रशेखर निवृत्ती कोऱ्हाळे याला अटक केली असून अन्य चार आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती दिल्यावर सरपंच योगेश उर्फ बाबू पाटे यांनी तपासाबद्दल समाधान व्यक्त करून सर्व आरोपींना त्वरित अटक करावी अशी मागणी केली . या गुन्ह्यात अधिक काही व्यक्ती सहभागी आहेत अशी माहिती पाटे यांनी दिली. या वेळी गुंड यांनी तपासात आणखीन आरोपी असेल तर त्यांचेवर कारवाई निश्चित होईल असे आश्वासन दिले. या वेळी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, विघ्नहरचे संचालक संतोष नाना खैरे, माजी सरपंच अशोक पाटे, सुजित खैरे, एकनाथ शेटे, आशिष माळवदकर, आरिफ आतार, संतोष पाटे, गणेश पाटे, संतोष दांगट, अजित वाजगे, विकास तोडकरी आदींसह सुमारे २०० ग्रामस्थ उपस्थित होते .
नारायणगावचे सरपंच योगेश ऊर्फ बाबू पाटे यांच्या नेतृत्वाखाली नारायणगाव शहरातून नारायणगाव पोलीस ठाणे असा मूक मोर्चा काढण्यात आला .