वाडा येथे धर्मनाथ महाराजांचा उत्सव साधेपणाने साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:18 AM2021-02-18T04:18:58+5:302021-02-18T04:18:58+5:30
पंचक्रोशीतील नागरिकांनी अतिशय उत्साहपूर्ण यात्रेत सहभाग घेतला तरी सोशल डिस्टन्सिंगचे पूर्ण पालन करण्यात आले. यात्रेनिमित्त विविध प्रकारचे खेळण्याची दुकाने ...
पंचक्रोशीतील नागरिकांनी अतिशय उत्साहपूर्ण यात्रेत सहभाग घेतला तरी सोशल डिस्टन्सिंगचे पूर्ण पालन करण्यात आले. यात्रेनिमित्त विविध प्रकारचे खेळण्याची दुकाने तसेच मिठाईची दुकाने रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आल्या होत्या. नागरिकांनी शेव रेवडी,लाडू यांचा आवर्जून आस्वाद घेतला. शनिवारी सकाळी वाद्यांच्या गजरात देवाला हारतुरे अर्पण करण्यात आले, तर रात्री पालखीची मिरवणूक काढण्यात आली. रात्री संगीत भजनांची मैफल रंगली होती, अशी माहिती सरपंच रघुनाथ लांडगे व उपसरपंच गणेश लांडगे यांनी दिली. यात्रेनिमित्त खेळण्यांचे पाळणे व इतर लहान मोठी खेळण्याची साधने बालगोपाळांसाठी आली होती, परंतु कोरोना संकटामुळे त्यांचा अपेक्षित व्यवसाय झाला नाही. अशा प्रकारे यात्रा उत्साहात पण साधेपणाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून साजरी करण्यात आली.